Mirzapurच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करतायत चाहते, गुड्डू भैयाने दिले हे अपडेट

मालिका-ए-रोज
Updated Aug 17, 2022 | 13:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mirzapur Season 3: मिर्झापूर सीझन ३ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या प्रेक्षकांसाठी अली फजलने हे मोठे अपडेट दिले आहे . काळ्या हुडीमध्ये गुड्डू भैय्याने आपला एक फोटो शेअर करत मिर्झापूर कमिंग सून असे लिहिले आहे. 

mirzapur 3
Mirzapur 3ची प्रतीक्षा करतायत चाहते, गुड्डू भैयाचे हे अपडेट 
थोडं पण कामाचं
  • आता चाहते प्रतीक्षा करत आहेत मिर्झापूरच्या तिसऱ्या हंगामाची.
  • याची उत्सुकता अली फजल उर्फ गुड्डू भैय्याने आणखी वाढवली आहे.
  • अली फजलने ब्लॅक ह्डीमधील आपला एक फोटो शेअर केला आहे.

मुंबई: अॅमेझ़ॉन(amazon) प्राईमची लोकप्रिय वेबसीरिज  'मिर्झापूर' (Mirzapur)ला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. मिर्झापूरच्या दुसऱ्या हंगामालाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. मिर्झापूरच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांची वाहवा मिळाली आणि आता चाहते प्रतीक्षा करत आहेत मिर्झापूरच्या तिसऱ्या हंगामाची. आणि याची उत्सुकता अली फजल(ali fazal) उर्फ गुड्डू भैय्याने आणखी वाढवली आहे. अली फजलने ब्लॅक ह्डीमधील आपला एक फोटो शेअर केला आहे यात त्याने कॅप्शनमध्ये फॅन आर्ट लिहिले आहे. खास बाब म्हणजे या फोटोसह मिर्झापूर ३  कमिंग सून असे लिहिले आहे जे चाहत्यांचा उत्साह वाढवत आहेत. Mirzapur 3 coming soon...

अधिक वाचा - सकाळी उठल्यावर कधीही करू नका 'या' पाच गोष्टी, होईल नुकसान

मिर्झापूर ३ मधील अली फजलचा फर्स्ट लूक

या पोस्टरमध्ये गुड्डू भैय्याने काळ्या रंगाची हुडी घातली आहे. तर पोस्टरवर या वेब सीरिजमधील सर्व कलाकारांची नावे लिहिली आहेत. मुन्ना भैय्या, कालीन भैय्या, बाऊजी या सर्वांची नावे पोस्टरवर आहेत. मागच्या भिंतीवर गोळ्यांचे निशाण दिसत आहेत. तर मिर्झापूर ३ सह कमिंग सून असे लिहिले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ali fazal (@alifazal9)

लवकरच संपणार मिर्झापूर सीझन ३ची प्रतीक्षा

मिर्झापूर सीझन ३मध्ये कालीन भैय्या त्याचा मुलगा मुन्नाच्या हत्येमुळे खूप आक्रोशीत झाला आहे. दुसरीकडे गुड्डू भय्याचे आधीपेक्षा जास्त गंभीर रूप पाहायला मिळेल. या हंगामात पंकज त्रिपाठी उर्फ कालीन भैय्या आणि गुड्डू भैय्या यांच्यात जबरदस्त मुकाबला पाहायला मिळेल. एकूण मिळून सीझन ३मध्ये आधीपेक्षा जास्त ड्रामा पाहायला मिळू शकतो. 

अधिक वाचा -  उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट, भाजपच्या गोटात भिती

या ऑगस्टला मिर्झापूर सीझन ३ची शूटिंग संपेल अशी बातमी आली होती. तर मिर्झापूर सीझन ३च्या रिलीजबद्दलही बातमी आली होती की यावर्षी नाही तर पुढील वर्षी २०२३मध्ये अॅमेझॉन प्राईमवर स्ट्रीमिंग केले जाईल. दरम्यान, अॅमेझॉनकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तिसऱ्या हंगामासाठी अली फजल आपल्या फिटनेसवर फोकस करत आहे. तो आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना हैराण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी