Mirzapur 3 story leaked : ओटीटी जगातील सगळ्यात हीट वेब सिरीज 'मिर्झापूर'चे दोन भाग रिलीज झाले आहेत आणि आता चाहते या वेबसीरिजच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत,ज्यावर काम सुरू झाले आहे. कालीन भैया मेले (पंकज त्रिपाठी) या प्रश्नावर या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाची कथा संपली होती? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात अजूनही कायम आहे, जो तिसऱ्या सीझनमध्ये समोर येणार आहे. पण ही वेबसीरिज येण्याआधी पंकज त्रिपाठीने तिसर्या सीझनची स्टोरी चाहत्यांना सांगितली.
चाहत्यांसोबतच पंकज त्रिपाठीही 'मिर्झापूर 3'साठी खूप उत्सुक आहे आणि तो लवकरच सीझन 3 चे शूटिंग सुरू करणार आहे. अभिनेत्याने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने सांगितले की मी लवकरच कॉश्चुम टेस्ट घेणार आहे. त्यानंतर आठवड्याभरात त्याचे शूटिंग सुरू होईल. मी आता पूर्ण स्क्रिप्ट ऐकेन. मी पुन्हा कालिन भैय्या बनण्यास उत्सुक आहे.
वेब सीरिजमधील कालिन भैय्याचे पात्र खूप दमदार आहे आणि त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल पंकज त्रिपाठी म्हणाले, “मला या शोमध्ये कालिन भैय्याचे पात्र साकारण्यात अधिक आनंद होतो. वास्तविक जीवनात मी खूप शक्तीहीन व्यक्ती आहे. या भूमिकेतून मला शक्ती जाणवते. सत्तेची भूक, जी प्रत्येकात असते आणि ती मिर्झापूरमधून भागवली जाते.पंकज त्रिपाठीच्या या मुलाखतीवरून हे स्पष्ट झाले आहे की सीझन 3 मध्येही कालिन भैया दिसणार आहे.
कालीन भैय्याच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या रसिका दुग्गलने सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात एका पेटीत कलाकारांचे कॉश्च्युम आहेत. लवकरच सीझन 3 चं शूटिंग सुरू करण्यात येणार आहे.
'मिर्झापूर' वेब सीरिजचा पहिला भाग २०१८ मध्ये आला होता आणि त्यानंतर फक्त दोन वर्षांनी सीझन २ स्ट्रीम झाला होता. या वेबसीरिजमध्ये मत्सर, प्रेम आणि सत्तेची भीती या सर्व गोष्टी एकत्र आल्या होत्या, त्यामुळे चाहत्यांनी या वेबसीरिजवर तितकंच प्रेम केले. आता सीझन 3 येणार आहे, ज्यामुळे चाहत्यांना मोठ्या आशा आहेत.