‘नागिन ३’मध्ये मौनी रॉय करणार एंट्री, एकता कपूरनं शेअर केला व्हिडिओ

मालिका-ए-रोज
Updated Apr 23, 2019 | 12:35 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Naagin 3 Mouni roy: ‘नागिन ३’च्या फॅन्सना आनंदाची बातमी आहे. एकता कपूरची फेमस सीरिअल नागिन ३ सुपर एक्साइट मोडवर आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये सुरभी ज्योती बरोबर मौनी रॉयही दिसणार आहे.

Mouni Roy
मौनी रॉय  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: ‘नागिन ३’ सीरियल आता फिनाले एपिसोडच्या अगदी जवळ पोहचली आहे. एकता कपूरनं व्हिडिओ रिलीज करताना लिहिलं की, “नागिन ३च्या सर्व प्रेक्षकांनी सीट बेल्ट बांधा. कारण शोचा धमाकेदार फिनाले होणार आहे. नागिन युनिव्हर्स आता ती परत येणार आहे या प्रोमोमध्ये सुरभी ज्योतीबरोबर मौनी रॉयसुद्धा दिसत आहे. खलनायिका रक्षंदा खानशी दोन हात करण्यासाठी सुरभी ज्योतीबरोबर मौनी रॉयनं एंट्री घेतली आहे.

एकता कपूरच्या नागिन सीरियलला प्रेक्षकांनी आधीच पसंती दर्शवली आहे. नागिनचा दुसरा भागही पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. दोन्ही भाग जबरदस्त हिट झाले. सुरभी ज्योतीच्या आधी नागिनमध्ये मोनी रॉय मुख्य भूमिकेत होती. तिच्या उत्कृष्ट अभिनयानं तिनं प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पण तिच्या फिल्म करिअरमुळं ती बिझी होत गेली आणि तिनं सीरिअलला रामराम ठोकला. पण आता ती पुन्हा एकदा नागिनच्या सेटवर परतली आहे.

 

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार अर्जुन बिजलानीनं सांगितलं आहे की, असं म्हणू शकतो मी सध्या डेट्सवर काम करत आहे. मौनी रॉयबरोबर पुन्हा एकदा एकत्र काम करायला खूप मजा येणार आहे. त्यामुळं खूपच एक्साइट आहे.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Of ancient evenings & distant music ? Watch us tonight & tomorrow evening 8 pm on @colorstv #bts #Naagin2 #Tandav

A post shared by mon (@imouniroy) on

 

नागिनच्या पहिल्या भागामध्ये मौनी रॉयबरोबर अर्जुन बिजलानी प्रमुख भूमिकेमध्ये होते. मौनी रॉयचे सध्या बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक सिनेमे येत असल्यानं तिचं शेड्युल्ड चांगलंच बिझी आहे. पण आपल्या फॅन्सना सरप्राइज देण्यासाठी मौनी रॉय पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. नुकतीच तिची RAW फिल्म रिलीज झाली. या फिल्ममध्ये ती जॉन अब्राहमबरोबर झळकली.

 

सुपर नॅचरल पॉवरवर आधारित या टिव्ही शोमध्ये सध्या तामसी हुकूम आणि विशाखाच्या मुलांची शत्रू बनली आहे. ‘ये है मोहब्बतें’ चा अभिनेता कृष्णा मुखर्जी तामसीचा रोल करत आहे. तसंच सुमित्रा बेलाला ठार मारण्याची इच्छा ठेवते. त्यातच आता या दोन्ही नागिन एकत्र येऊन बदला घेतांना दिसतील.

मौनी रॉयच्या पुढच्या वाटचालीसाठी तिली सर्वजण शुभेच्छा देत आहेत आणि आता पुन्हा नागिनच्या रुपात तिला बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी