मौनी रॉय-सुरभि ज्योतिसोबत करणार तांडव डान्स, नागिन ३ चा क्लायमॅक्स व्हिडिओ झाला लीक

मालिका-ए-रोज
Updated May 10, 2019 | 17:31 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

'नागिन ३' च्या लास्ट मेगा एपिसोडमध्ये बेला अर्थात सुरभि ज्योती आणि शिवान्या अर्थात मौनी रॉयचा तांडव डान्स पाहायला मिळणार आहे. दोघी नागिण शिव मंदिरात जोरदार तांडव नृत्य करताना दिसणार आहेत.

naagin 3
नागिन ३  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: प्रेक्षकांची जबरदस्त पसंती मिळवलेली नागिन ३ ही मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. सुरभि ज्योती, पर्ल वी पुरी आणि अनिता हसनंदानी यांचा हा शो २६ मेला संपणार आहे. यातच मालिकेचा लास्ट मेगाएपिसोडसाठी जोरदार तयारी सुरू आहे. एकता कपूरने खरी नागिन मौनी रॉय आणि मुख्य अभिनेता अर्जुन बिजलानी आणि करणवीर बोहरा यांना या एपिसोडसाठी निमंत्रित केले आहे. नुकताच मौनी रॉय, अर्जुन बिजलानी आणि करणवीर बोहराने सुरभि ज्योती, अनिता हसनंदानी आणि पर्ल वी पुरीसोबत या अखेरच्या एपिसोडचे शूटिंग केले. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विशेष म्हणजे या एपिसोडमध्ये बेला अर्थात सुरभि आणि शिवान्या अर्थात मौनी रॉयचा तांडव डान्स पाहायला मिळणार आहे. दोघांनी शिव मंदिरात जोरदार डान्स केला. या डान्स शूटचे काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात दोन्ही अभिनेत्री डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. 

एकता कपूर नागिन ३ या मालिकेच्या अखेरच्या एपिसोडची कोणतीही माहिती लीक होऊन नये यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी मीडियालाही शूटिंगच्या सेटवर येण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच पीआरलाही याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. असे असतानाही या शूटिंगचे व्हिडिओ सतत व्हायरल होत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी