Mumbai: दोन वर्षांच्या मुलीला गमावण्याचं दु:ख सांगतोय हा अभिनेता; खेळणे गिळल्याने झाला होता मृत्यू

मालिका-ए-रोज
Updated May 15, 2019 | 12:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

सिरिअल अभिनेता प्रतीश व्होरा अजूनही मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेला नाही. घरात खेळताना मुलीनं एक खेळणं तोंडात घातलं. तिच्या घशात अडकलेलं खेळणं काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तिला वाचवण्यात अपयश आलं.

pratish vora
प्रतीश व्होराच्या मुलीचा दुदैवी मृत्यू   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई : आपल्या दोन वर्षांच्या मुलीला डोळ्यादेखत समोरचं मृत्यूशी झुंज देताना पाहिलेला, सिरिअल अभिनेता प्रतीश व्होरा अजूनही मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेला नाही. मुलीच्या मृत्यूची बातमी त्यानं सोशल मीडियावर शेअर केली होती. घरात खेळता खेळता मुलीनं एक खेळणं तोंडात घातलं. तिच्या घशात अडकलेलं खेळणं काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तिला वाचवण्यात यश आलं नाही. अंगावर काटा आणणारी ही घटना प्रतीश अजूनही विसरत नाही. या धक्क्यातून सावरणं फार अवघड असल्याचं तो सांगतो. आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर प्रतीश आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं नुकताच स्पॉटबॉयला एक इंटव्ह्यू दिला. त्यात त्यानं मुलीबाबत जे काही घडलं ते शेअर केलंय. काही क्षणांच्या संघर्षातच माझ्या मुलीचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यानं दिली.

प्रतीश त्यावेळी आपल्या काही मित्रांसोबत घरातच होता. मुलगी खेळत होती. अचानक तिनं त्यातलं एक खेळणं तोंडात घातलं. याविषयी प्रतिश म्हणाला, ‘मी तिच्या तोंडात बोट घालून ते खेळणं काढण्याचा प्रयत्न करत होतो. ती मला थांबवत होती. ती खूपच घाबरली होती. खेळण्यातला तुकडा खूपच आत गेला होता.’

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Cuteness overloaded ? #cutebabies #family #indiancutebaby #littlebaby #cutiepie #babygirl #cutenessoverload

A post shared by Pratish Vora (@vorapratishofficial) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Watch me from today “Udan” as Pawan Lal -tuntun’s father #colours #artistlife #actor #filmy

A post shared by Pratish Vora (@vorapratishofficial) on

 

त्यानंतर प्रतीश मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. तिच्या शरीरातून रक्त येऊ लागलं होतं. डॉक्टरांनी कसं तरी ते रक्त थांबवलं. पण, मुलीचा श्वास अडखळला होता. ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित होती. पण, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन प्रकिया नीट होत नव्हती.
प्रतीश म्हणाला, ‘डॉक्टरांनी ती बरी आहे पण तिला किमान २४ ते ४८ तास ऑबजर्वेशनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला होता. पण, तिच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि तिला श्वासही घेता येत नव्हता. अखेर रात्री एक वाजता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.’

'तिची आठवण येते'

‘आम्ही आमच्या मुलीला हरवून बसलो आहोत. पण, आमच्यासाठी हा काळ खूपच कठीण असणार आहे. ती अजूनही आमच्यासोबत असल्यासारखेच वाटते. मी यातून आपलं लक्ष दुसरीकडं वळवण्याचा प्रयत्न केला तरी, तिची आठवण येत राहते. त्यानंतर मी पूर्ण घटनेविषयी विचार करायला लागतो आणि अचानक थांबतो. मी असं नाही म्हणणार की माझा परमेश्वरावरचा विश्वास उडाला आहे. पण, मला असं वाटतं की आयुष्य हे पुढं चालत राहिलं पाहिजे. त्यातूनच आम्ही या धक्क्यातून स्वतःला बाहेर काढू शकू,’ असे प्रतीशने सांगितले. प्रतीश व्होरा 'प्यार का पापड', 'तारक मेहता का उल्टा चश्मा' आणि 'क्राइम पेट्रोल' सारख्या सीरिअलमध्ये आपल्याला पहायला मिळाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी