'तारक मेहता'तली बबिता ९ वर्षांनी लहान असलेल्या टप्पूच्या प्रेमात

'तारक का मेहता उलटा चश्मा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत 'बबिता' ही भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता प्रेमात पडली आहे. बबिता फेम मुनमुन दत्ता मालिकेतील टप्पूच्या प्रेमात पडली आहे.

Munmun Dutta and Raj Anadkat of 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' are a couple; 9 years age-difference no bar- Exclusive!
'तारक मेहता'तली बबिता ९ वर्षांनी लहान असलेल्या टप्पूच्या प्रेमात 

थोडं पण कामाचं

  • 'तारक मेहता'तली बबिता ९ वर्षांनी लहान असलेल्या टप्पूच्या प्रेमात
  • मुनमुन दत्ता आणि राज अनाडकटच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या प्रेमाविषयी माहिती आहे
  • 'तारक का मेहता उलटा चश्मा'च्या टीमलाही मुनमुन आणि राजच्या 'लव्हस्टोरी'ची कल्पना

मुंबईः 'तारक का मेहता उलटा चश्मा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत 'बबिता' ही भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता प्रेमात पडली आहे. बबिता फेम मुनमुन दत्ता मालिकेतील टप्पूच्या प्रेमात पडली आहे.

सध्या मालिकेत टप्पूची भूमिका राज अनाडकट (२४) करत आहे. तरुण टप्पूच्या भूमिकेत राज २०१७ पासून काम करत आहे. बबिता या टप्पूच्या प्रेमात पडली आहे. विशेष म्हणजे मुनमुन दत्ता ही राज अनाडकटपेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे. पण वयातील हे अंतर त्यांच्या प्रेमात अडथळा ठरलेलं नाही.

मुनमुन दत्ता आणि राज अनाडकटच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या प्रेमाविषयी माहिती आहे. 'तारक का मेहता उलटा चश्मा'च्या टीमलाही मुनमुन आणि राजच्या 'लव्हस्टोरी'ची कल्पना आहे. मुनमुनच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवर राजने दिलेल्या प्रतिक्रिया बघितल्या तर दोघांच्या 'लव्हस्टोरी'च्या वृत्तात तथ्य असल्याचे लक्षात येते. 

'टाइम्स ऑफ इंडिया'च्यावतीने एका प्रतिनिधीने या विषयावर बोलण्यासाठी मुनमुन दत्ता आणि राज अनाडकट या दोघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण सूचक मौन बाळगून या विषयावर जाहीरपणे चर्चा करणे टाळण्याचा निर्णय दोघांनी घेतल्याचे दिसले.

दोन महिन्यांच्या मोठ्या सुटीनंतर मुनमुन पुन्हा एकदा 'तारक का मेहता उलटा चश्मा'मध्ये परतली आहे. तिच्या आगमनानंतर मुनमुन आणि राजच्या 'लव्हस्टोरी'ची चर्चा मीडियात सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी