DID Lil Masters show: ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्सच्या पुढील भागात दिसणार आहेत. प्रोमो व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, आशा भोसले या शोमध्ये गेस्ट जज म्हणून पोहोचल्या आहेत. त्यानंतर त्यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली.झी टीव्हीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये, मुलांनी आपल्या बहिणीच्या गाण्यांवर सादरीकरण केल्यामुळे आशा भोसले भावूक झाल्या.
व्हिडिओमध्ये त्या बहिणीच्या फोटोसमोर प्रार्थना करतानाही दिसत आहे. लता मंगेशकर यांचे कोविड-19 शी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर फेब्रुवारीमध्ये निधन झाले.
स्पर्धकांचा हा परफॉर्मन्स पाहून आशा भावूक होतात आणि रुमालाने अश्रू पुसत म्हणातात, “माझी दीदी आता गेली, पण तरीही ती माझ्यासोबत आहे.” यानंतर मौनी रॉयही भावूक झाली, तिच्या डोळ्यातून अश्रूही वाहू लागले. त्याचवेळी, लता दीदींची आठवण करून शोचे बाकीचे जज आणि स्पर्धकही भावूक झाले.
मौनी रॉयने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शो दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये आशा भोसले खुर्चीवर बसलेल्या दिसत आहेत, तर मौनी जमिनीवर बसून आशा भोसले यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे.
8 जानेवारी 2022 रोजी लता मंगेशकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 20 दिवसांनंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे दिसून आले परंतु अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्या बालन, शाहरुख खान, रणबीर कपूर, आमिर खान यांच्यासह अनेकांनी अंत्यसंस्काराला हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लता दीदींना श्रद्धांजली वाहिली होती.
एका मुलाखतीदरम्यान लता मंगेशकर यांनी त्यांची बहीण आशा भोसले यांच्यासोबतच्या नातेसंबंधाबद्दल मोकळेपणाने सांगितले. बहिणीसोबतच्या नातेसंबंधात दुरावा असल्याच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या,
आमच्यात कधीच व्यावसायिक शत्रुत्व नव्हते, असे लतादीदींनी सांगितले होते. आशाने माझ्यापासून पूर्णपणे वेगळी गाण्याची शैली विकसित केली होती. ती जे करू शकते, ते मी करू शकत नाही. पंचम (आर. डी. बर्मन, आशा भोसलेशी विवाहित; 1980 ते 1994) सोबतही, मी त्यांच्यासाठी गायलेली गाणी आशाने पंचमसाठी गायलेली गाणी खूप वेगळी होती. मी कटी पतंगमध्ये पंचमसाठी 'ना कोई उमंग है' गायले आहे.