बाळूमामाच्या नावानं चांगभलं मधल्या बाल रूपी बाळू मामांना लवकरच म्हणावं लागणार अलविदा

मालिका-ए-रोज
Updated May 16, 2019 | 14:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Balu Maamachya Navane Chaang Bhala to take a Leap: लोकप्रिय मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलंमध्ये लवकरच एक नवीन वळण येणार आहे. मालिका लवकरच लिप घेणार असून बाल रूपातील बाळू मामांना अलविदा म्हणावे लागणार आहे.

Mythological show Balu Mamachya Navane Chaang Bhala to take a leap
बाळू मामाच्या नावानं चांग भलंमधल्या बाल रुपी बाळू मामांना लवकरच म्हणावं लागणार अलविदा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. अनेक थोर संत लाभलेल्या याच मातीत बेळगाव म्हणजेच दक्षिण महाराष्ट्राचे दैवत असलेले बाळू मामा सुद्धा जन्मले. त्यांच्याच आयुष्यावर आधारित बाळूमामाच्या नावानं चागंभलं ही मालिका मध्यंतरी सुरू झाली आणि बघता-बघता मालिकेच्या लोकप्रियतेनं शिखर गाठलं. फक्त दक्षिण महाराष्ट्रापुरता ही लोकप्रियता मर्यादा राहिली नसून संपूर्ण महाराष्ट्रात बाळूमामांच्या नावाचा जयघोष होताना दिसतोय. सध्या मालिकेनं एक रंजक टप्पा गाठला असून लवकरच मालिका लिप घेणार आहे. मालिकेचा नवीन प्रोमो सुद्धा नुकताच रिलीज झालाय आणि त्यात समोर येतं ते बाळू मामांचं नवीन रूप. बालपणीतले बाळू मामा आता मालिकेतून रजा घेणार असून मोठेपणीचे बाळू मामा लवकरच मालिकेत अवतरणार असं आता समोर आलं आहे.

 

 

सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमध्ये मालिकेतील बाल रूपातील बाळूमामांच्या लग्नाचा घाट घातला होता. पण बाळूमामांनी लग्न करण्यास साफ नकार दिला. त्यानंतर बाळू मामांची आई सुंदरा यांना एक स्वप्न पडलं आणि त्यात त्यांना बाळूमामा मोठे झालेले दिसले. तेव्हाच कुठेतरी बाळूमामांच्या मोठेपणीच्या रूपाची नांदी झाली असंच म्हणावं लागेल. कारण लगेचंच मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज केला गेला. सध्यातरी मालिकेतील बाल कलाकार समर्थ पाटील बाळू मामा म्हणून घरा घरात पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा ट्रॅक संपून नवीन ट्रॅक सुरु होणार यासाठी प्रेक्षक उत्सुक असले तरी या छोट्या बाळू मामांना छोट्या पडद्यावर प्रेक्षक नक्कीच मिस करतील हे निश्चित.

 

 

 

लवकरच मालिकेत एक नवीन अध्याय सुरू होणार असून बाळू मामांच्या मोठेपणीच्या आयुष्याचं दर्शन मालिकेत रेखाटलं जाणार आहे. त्यांच्या प्रापंचिक आयुष्यातले बारकावे, त्यांनी केलेला गोरगरिबांचा कैवार, त्यांच्या विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार या मालिकेच्या नवीन ट्रॅकमधून प्रेक्षकांसमोर येणार असून या महान संताच्या त्यागाचं दर्शन देखील मालिकेत घडेल. मालिकेतील बाळू मामा तर मोठे होत आहेत. पण त्याचसोबत मालिकेतले इतर लोकप्रिय कॅरेक्टर सुंदरा, मयप्पा, वैजयंता, गावचे पंच, देवप्पा, तात्या, मंगळू, इत्यादी बदलणार का की फक्त त्यांचे लूक्स बदलणार हे पाहावं लागेल. कारण छोट्या बाळू मामा इतकंच लोकप्रियता या कलाकारांची सुद्धा आहे. सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमध्ये लवकरच बदल होत मालिकेतला हा मोठा बदल पार पडेल.  छोट्या रूपातील बाळू मामांच्या जागी मोठ्या रूपातील बाळू मामांचं दर्शन प्रेक्षकांना घडेल. येत्या काही भागांमध्ये छोटे बाळू मामा पडद्यावर दिसणार असून येत्या 20 मे पासून मात्र बाळू मामांचं मोठेपणीचं रूप पडद्यावर अवतरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
बाळूमामाच्या नावानं चांगभलं मधल्या बाल रूपी बाळू मामांना लवकरच म्हणावं लागणार अलविदा Description: Balu Maamachya Navane Chaang Bhala to take a Leap: लोकप्रिय मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलंमध्ये लवकरच एक नवीन वळण येणार आहे. मालिका लवकरच लिप घेणार असून बाल रूपातील बाळू मामांना अलविदा म्हणावे लागणार आहे.
Loading...
Loading...
Loading...