बिग बॉस मराठी घरात नेहाकडून बाप्पासाठी डील

मालिका-ए-रोज
Updated Jun 19, 2019 | 21:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss Marathi house Neha's new deal: बिग बॉस मराठीत एक डाव धोबी पछाड टास्कमध्ये नवीन खलबतं रचायला सुरुवात होताना दिसणारय. आज घरात टीम एची मॅनेजर नेहा, टीम बीचे मॅनेजर बाप्पा यांना एक नवं डील देताना दिसेल.

Neha tries tor crack a deal with Bappa in Ek Daav Dhobhi Pachad task in the Bigg Boss Marathi 2 house
बिग बॉस मराठी घरात नवीन टास्कदरम्यान टीम ए मॅनेजर नेहाकडून टीम बी मॅनेजर बाप्पासाठी डील  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बिग बॉस मराठी २च्या घरात नवीन टास्क येताच नवा गोंधळ तर दिसायला लागतोच पण त्याचसोबत दिसतं ते काही स्पर्धकांचं चातुर्य. या बिग बॉसच्या घरात टास्कमध्ये असे काही स्पर्धक आहेत जे टास्क मनानेच नाही तर डोक्याने पण खेळताना दिसतात. त्यातलीच एक म्हणजे नेहा शितोळे. नेहाने आजवर सगळ्या टास्कमध्ये उत्तम खेळ खेळला आहे. त्यामुळे घरात एक डाव धोबी पछाड हे साप्ताहीक टास्क जाहीर होताच नेहाच्या विचारांना पुन्हा एकदा चलना मिळणार हे तर अगदी सरळ आहे. त्यात या नवीन टास्कमध्ये नेहा टीम एची मॅनेजर आहे म्हटल्यावर हे टास्क जिंकण्यासाठी नेहा सगळे प्रयत्न करताना दिसेल. असाच एक प्रयत्न करताना नेहा थेट दुसऱ्या टीमचे मॅनेजर असलेल्या बाप्पा यांना गाठताना दिसणार आहे.

टास्क सुरु असताना नेहा थेट बाप्पा यांच्याकडे एक डील घेऊन जाणार आहे. या टास्कमध्ये दोन्ही टीम्सला कपडे साफ धुवून इस्त्री करुन घडी घालून द्यायचे आहेत. त्यात प्रत्येक कपड्यावर काही पॉईंट्स असणार आहेत म्हणे. अशातंच नेहा बाप्पा यांना डील देत ४ साफ, पूर्ण तयार कपडे तिच्या टीमला देण्यासाठी सांगते. पण या आधीच नेहा आणि बाप्पा यांनी एकमेकांचा एक-एक कपडा खेळातून बाद केल्याने बाप्पाला ते फारसं पटत नाही. बाप्पा सुद्धा फारंच तरबेज आहेत. ते सुद्धा डोकं लावत नेहाला सांगताना दिसतात की जर तिच्या टीमला ४ कपडे दिले तर टीम एकडे जास्त कपडे होतील. अशाने त्यांच्या टीमच्या हरण्याचे चान्स वाढतील. म्हणून ते तिला वेगळाच पर्याय देताना दिसतात.

 

 

नेहाच्या डीलबद्दल काहीशी आशंका असल्यामुळे बाप्पा नेहाची डील नाकारतात आणि तिला म्हणतात की त्यापेक्षा ते त्यांच्या टीमला पुढच्या आठवड्यात नेहाला नॉमिनेट होण्यापासून वाचवायला सांगतील. म्हणजे एकंदरीत त्यांच्या टीममधून कोणीही नॉमिनेशनसाठी नेहाचं नाव घेणार नाही याची खात्री ते तिला देताना दिसतात. आता हा पर्याय नेहा स्विकारते की पुन्हा काहीतरी नवीन डील घेवून बाप्पा यांच्याकडे जाते ते आजच्या भागात कळेलंच. शिवाय या नवीन टास्कमध्ये नव्या टीम्स बनताना दिसणार आहेत कारण घरातला एक घट्ट ग्रुप तुटल्याचा परिणाम घरातल्या नात्यांवर आणि एकंदर समिकरणांवर होताना दिसतोय. त्यामुळे निष्ठा सुद्धा बदलल्या आहेत. त्यामुळे हे नवीन टास्क फक्त गेम प्लॅनसाठी मर्यादीत न राहता घरातल्या बदलत्या गणितांवर सुद्धा प्रकाश टाकताना दिसेल असं दिसतंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉस मराठी घरात नेहाकडून बाप्पासाठी डील Description: Bigg Boss Marathi house Neha's new deal: बिग बॉस मराठीत एक डाव धोबी पछाड टास्कमध्ये नवीन खलबतं रचायला सुरुवात होताना दिसणारय. आज घरात टीम एची मॅनेजर नेहा, टीम बीचे मॅनेजर बाप्पा यांना एक नवं डील देताना दिसेल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles