‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेतील अनघा देवींची एन्ट्री श्री दत्तांसाठी एक मोहपाश?

मालिका-ए-रोज
Updated Nov 07, 2019 | 20:04 IST | चित्राली चोगले

स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या सुरु असलेली ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. मालिकेत आता लवकरच अनघा देवींची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिकेत एक नवीन आध्याय अनुभवायला मिळणार आहे.

new character anagha devi to make an entry in mythological marathi show shri gurudev datta
‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेतील अनघा देवींची एन्ट्री आहे श्री दत्तांसाठी एक मोहपाश? 

थोडं पण कामाचं

  • ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेत सुरु होणार नवीन अध्याय
  • लवकरच होणार मालिकेत अनघा देवींची एन्ट्री
  • श्री दत्तांसाठी अनघा देवींच्या येण्याने वाढणार अधिक गुंता

मुंबई: ‘श्री गुरुदेव दत्त’ ही पौराणिक मालिका सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर उत्तम सुरु आहे. मालिकेने कमी वेळात चांगली लोकप्रियता मिळवण्यात यश मिळवलं आहे. मालिकेत विस्तारीत कथा आणि प्रसंग अगदी अंगावर येणारे असतात. तसंच मालिकेतील सगळीच पात्रं अप्रतिम जमून आली आहेत. मालिकेत बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मध्यंतरी मालिकेत श्री दत्त आणि भैरव यांच्यात एक मोठा महासंग्राम अनुभवायला मिळाला. या महासंग्रामात श्री दत्त यांचं काहीसं रुद्र रुप पहायला मिळालं. हा महासंग्राम फार रंजक ठरला आणि उत्तम रंगला सुद्धा. यानंतर मालिकेत आता अजून एक वळण येणार आहे आणि एक नवीन अध्याय सुरु होताना दिसेल.

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत नवा अध्याय नेमका कोणता असणार आहे त्याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये आहे. कर्णकुमार आणि जांभासूर यांचा श्री दत्तांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न अखंड सुरु असताना आता या कथानकात एक नवीन पात्र दाखल होणार आहे. मालिकेत आता लवकरच अनघा देवींची एन्ट्री होणार आहे. अनघा देवींच्या येण्याने भक्तांमध्ये दत्तांविषयी अनेक संभ्रम निर्माण होणार आहेत. त्यामुळे या नवीन अध्यायातून नेमकं काय समोर येतं ते पहावं लागेल. श्री दत्त अनघा देवींच्या मोहपाशात का अडकले आहेत? हा गहन प्रश्न सुद्धा उपस्थित होताना दिसेल. त्यामुळे या नवीन अध्यायात अनेक नवीन घडामोडी निश्चितंच घडणार आहेत.

वाडी, गाणगापूर आणि औंदुबर या दत्तक्षेत्रांवर जांभासूर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. इतकंच नाही तर श्री गुरुदेव दत्तांच्या नावातल्या श्री आणि गुरुदेव या दोन्ही शब्दांवरही त्याचा आक्षेप आहे. श्रीदत्तांच्या नावाचा धावा करणाऱ्या भक्तांना दंड होईल असा फतवाही जांभासुराने काढलाय. जांभासुराच्या अत्याचारांनी भक्तगण त्रस्त असताना श्रीदत्त मात्र अनघा देवींच्या मोहपाशात अडकले आहेत. माता अनसुयेचाही त्यांना विसर पडला आहे. भक्तांच्या उद्धारासाठी सदैव तत्पर असलेले श्री दत्त अनघा देवींच्या येण्याने भक्तांपासूनच दूर होत आहेत. हा सगळा विषय नेमका काय आणि या गुंत्यातून नेमका मार्ग कसा निघणार हे येत्या काही दिवसात मालिकेमध्ये समोर येईल.

श्री दत्तांच्या अश्या वागण्यामागचं नेमकं कारण काय? अनघा देवींच्या प्रकट होण्यामागे काय रहस्य आहे? याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘श्री गुरुदेव दत्त’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी