21 ऑक्टोबरपासून झी मराठीवर नवीन मालिका, मग कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

मालिका-ए-रोज
Updated Oct 04, 2019 | 14:50 IST | चित्राली चोगले

झी मराठी वाहिनी कायम नवीन प्रयोग करत प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्यात अग्रगण्य असते. नुकतंच या वाहिनीवर नवीन मालिका लग्नाची वाईफ वेडिंगची बायकूचे प्रोमो तर जोरदार सुरु आहेत. मग कोणती मालिका बंद होणार ते पाहा.

new show announced on zee marathi lagnachi wife weddingchi baiku
21 ऑक्टोबरपासून झी मराठीवर नवीन मालिका सुरु मग कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • झी मराठीवर नवीन मालिका जाहीर होताच नवीन प्रश्न निर्माण
  • २१ ऑक्टोबरपासून 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू मालिका' सुरु होणार
  • मग कोणती मालिका घेणार रजा हे वाचा सविस्तर

मंबई: झी मराठी वाहिनी कायम नवनवीन मालिका आणि विषय घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यामध्ये अग्रगण्य असते. सध्या सर्वाधिक टीआरपी असलेल्या पहिल्या पाच मालिका याच वाहिनीवर सुरु आहेत. आता तर या वाहिनीवर नवीन मालिका जाहीर झाली आहे. नुकतंच लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या नावाच्या मालिकेचे प्रोमो सुरु झाले असून सध्या ते जोरदार पद्धतीत दाखवले जात आहेत. ही मालिका येत्या २१ ऑक्टोबरपासून रोज संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार असं देखील जाहीर झालं आहे. त्यामुळे आता एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. की संध्या. ७.३० वा. जर ही मालिका सुरु होणार तर नेमकी कोणती मालिका रजा घेणार?

या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही देखील प्रयत्न केला. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं तसंच आम्हाला देखील वाटलं की संध्या. ७.३० वा. म्हणजे लाडक्या राणा दा आणि पाठक बाईंची मालिका तुझ्यात जीव रंगला निरोप घेणार की काय. पण मग आम्ही देखील खूप विचार केला आणि थोडीफार माहिती मिळवली. त्यानंतर कळंल की तुझ्यात जीव रंगला इतक्यात तरी रजा घेणार नाही आहे. एकतर ती टीआरपीप्रमाणे नंबर वन मालिका आहे. त्यात सध्या तरी त्याचा ट्रॅक उत्तम सुरु आहे. त्यामुळे या मालिकेचा पल्ला अजून बाकी आहे. म्हणूनच ही मालिका संध्या. ७.३० वा. दिसत असली तरी नवीन मालिका सुरु होताच या मालिकेची फक्त वेळ बदलली जाणार आहे. आता या मालिकेची वेळ बदलणार म्हणजे कदाचीच ही मालिका रात्री. ८ वा. दाखवणार असल्याची शक्यता आहे.

 

 

असं झाल्यास माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचं काय होणार असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्यावर असं समजतंय की, ही मालिका सुद्धा बंद होणार नाही आहे, इतक्यात तरी. त्यामुळे या मालिकेची वेळ देखील बदलेल असं बोलंल जात आहे. ही मालिका सुद्धा बराच काळ सुरु असली तरी सध्या ही मालिका टीआरपी गेममध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या मालिकेला सुद्धा इतक्यात राम-राम म्हणावं लागणार नाहीय.

 

 

 

एकंदरीत नवीन मालिका नवीन विषय घेऊन सुरु तर होईल पण सध्याचं चित्र बघता झी मराठीवरील कोणतीच मालिका बंद होणार नाही असं दिसत आहे. फक्त सगळ्या मालिकांची वेळ बदलली जाणार आहे. आता ही नवीन मालिका जरी नवीन असली तरी त्याचा विषय माझ्या नवऱ्याची बायको जवळ जाणारा आहे अशी सध्या चर्चा आहे. विदर्भाच्या पार्श्वभूमिवर बेतलेल्या या मालिकेत लग्नाची वाईफ असताना फॉरेन रिटर्न मुलगा वेडिंगची बायको घरात आणतो असा थोडक्यात ड्रामा रंगणार आहे. त्यामुळे ही मालिका या व्यतिरिक्त काय वेगळेपण देते ते पहावं लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी