'लागिरं झालं जी' फेम अभिनेता निखिल चव्हाण ठरला 'छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022' चा मानकरी

संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022” सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेता निखिल चव्हाण याला जाहीर करण्यात आलेला आहे.

Nikhil Chavan
अभिनेता निखिल चव्हाण   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  • सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेता निखिल चव्हाण याला छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022 देण्यात आला आहे.

मुंबई : मालिका, चित्रपटातील वेधक आणि मुख्य भूमिकांमधून निखिल चव्हाणने अनेकांच्या मनात घर बनवलं आहे. अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या निखिलचा नाटक, मालिका, चित्रपट, वेबीसिरीज असा वाढतच जाणारा अभिनय कौशल्याचा आलेख वाखाणण्याजोगा आहे. निखिलचा अभिनयाने अनेकांची मने जिंकली असून त्याच्या कष्टाचं त्याला फळ मिळताना दिसत आहे. कारण संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022” सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेता निखिल चव्हाण याला जाहीर करण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक 14 मे 2022 ला पुरंदर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात युवराज शहाजीराजे संभाजीराजे भोसले ,खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार रोहित पवार, आमदार संजय जगताप, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराने निखिलला सन्मानित करण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आजवर सिनेक्षेत्रात या पुरस्काराचे मानकरी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते अमोल कोल्हे, अभिनेते भरत जाधव, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनेते अशोक समर्थ हे ठरले आहेत.

यंदा या मानकरांच्या यादीत अभिनेता निखिल चव्हाण याच्या नावाचा समावेश झाला आहे.याबाबत बोलताना निखिल म्हणाला की, "अभिनयक्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीची याहून चांगली पोचपावती असूच शकत नाही. कारण “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022” हा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्काराचा मानकरी मी ठरलो. हा पुरस्कार मला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच पुरंदर किल्ल्यावर मिळाला आहे, आणि किल्ल्यावर पुरस्कार मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे. कारण महाराजांचे किल्ले आपल्यासाठी आदरणीय आहेत असे मला वाटते. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटतेय ती म्हणजे, हा गडकिल्ला इंडियन डिफेन्सच्या हातात आहे, त्या गडकिल्ल्यावर हा पुरस्कार मला मिळाला ही नक्कीच माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी