Swami Samartha Prakat Din: स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामी भक्तांना खास पर्वणी, शिव-पार्वतीच्या रुपात अवतरणार स्वामी

मालिका-ए-रोज
Updated Apr 02, 2022 | 19:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Swami Samartha Prakat Din: स्वामी समर्थांचा उद्या प्रकट दिन आहे. संत परंपरेतील एक अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री स्वामी समर्थ.सध्या टेलिव्हिजनवर स्वामी समर्थांवर आधारित मालिका प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. या मालिकेत स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता आहे अक्षय मुडावदकर. नुकतंच प्रेक्षकांनी त्याला लोकप्रिय नायक म्हणूनही पसंती दिलेली आहे.

Swami Samartha Prakat Din
स्वामी समर्थ धारण करणार शिव-पार्वतीचं रुप  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्वामी समर्थ धारण करणार शिव-पार्वतीचं रुप
  • स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष भाग
  • अभिनेता अक्षय मुडावदकर साकारतोय स्वामी समर्थांची भूमिका

Swami Samartha Prakat Din: स्वामी समर्थांचा उद्या प्रकट दिन आहे. संत परंपरेतील एक अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री स्वामी समर्थ. सध्या टेलिव्हिजनवर स्वामी समर्थांवर आधारित मालिका प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. या मालिकेत स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता आहे अक्षय मुडावदकर. नुकतंच प्रेक्षकांनी त्याला लोकप्रिय नायक म्हणूनही पसंती दिलेली आहे. जाणून घेऊ, थोडसं अभिनेता अक्षय मुडावदकरबद्दल. 


स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक होते. सोलापूर जवळील अक्कलकोट हे त्यांचे मूळ क्षेत्र आहे. यंदा कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अक्कलकोट मधील स्वामी समर्थ मंदिरामध्ये भाविकांना प्रवेशबंदी आहे पण अक्षय मुडावदकर आपल्या अभिनयाद्वारे स्वामी भक्तांना टेलिव्हिजनच्या माध्यामातून भेटीला येत आहे. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.' असा मंत्र देणार्‍या स्वामी समर्थांचे तारकमंत्र, आरती, जपमंत्र हे त्यांच्या भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.

अक्षय मुडावदकर हा अभिनेता मूळचा नाशिकचा आहे. जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून अक्षय स्वामी समर्थ म्हणून घराघरात पोहोचला आहे.  जय स्वामी समर्थ मालिका करण्यापूर्वी नाटक, मालिकांमध्येही काम केले आहे. मॉडेल म्हणून त्याने कलाक्षेत्रात पदार्पण केले, 2019 साली त्याने शॉर्ट फिल्म 'अ पिस ऑफ पेपर' मध्ये काम केले आहे. त्यानंतर स्वराज्य जननी जीजामाता या मालिकेचा देखील भाग होता. मराठी रंगभूमीवर अक्षय ' गांधी हत्या आणि मी' मध्ये देखील काम करतो. 


स्वामी स्मर्थ प्रकट दिन विशेष भागामध्ये स्वामी शिव-पार्वती एकत्र होतात आणि प्रकटतं स्वामींचं रुप. हे रुप पाहण्यासाठी ते अखंड चैतन्य पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खासउत्सुकता आहे. 

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमधून आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झाला आहे. स्वामी समर्थांची भूमिका साकारण्यासाठी अक्षय मुडावदकरने खूप मेहनत घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या भूमिकेच्या बारकाव्यांसाठी त्याने खास अ‍ॅक्टिंग वर्कशॉप्स केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी