Rohit Raut- Juilee Joglekar Wedding update : सारेगमप लिटील चॅम्पसमधून (Saregampa Little Champ) घराघरात पोहोचलेला लिटील चॅम्प म्हणजे रोहित राऊत. नुकतेच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर लग्नबंधनात अडकले आहेत. पुण्यातील ढेपेवाड्यामध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral On Social Media) झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठी इंडस्ट्रीतसुद्धा लग्नाचा सीझन सुरू आहे.
अगदी ग्रहमकापासून हळद, मेहेंदी आणि संगीताचा कार्यक्रमही मोठ्या धामधुमीत पार पडला.
गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघंही एकमेकांना डेट करत आहेत.
रोहित आणि जुईली (Rohit Raut- Juilee Joglekar) या दोघांनी देखील आपल्या लग्नासोहळ्यातील खास क्षण आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
दोघांच्याही प्रत्येक फोटोला चाहत्यांनी लाईक्स करत भरभरुन कमेट्स केल्या आहेत. रोहित आणि जुईलीच्या खास मैत्रीण मिताली मयेकरने या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
जुईली जोगळेकरही एक उत्कृष्ट गायिका आहे. सूर नवा ध्यास नवा (Sur Nava Dyas Nava) या रिएलिटी शोमध्ये ती सहभागी झाली होती. दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.