झी मराठीच्या आगामी ‘ती परत आलीय’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित, देवमाणूस बंद होण्याच्या चर्चांना ऊत

मालिका-ए-रोज
Updated Jul 19, 2021 | 10:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

झी मराठीवरची लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' रात्री साडेदहाच्या वेळेत टीआरपीबाबत सर्वोच्च स्थानी आहे. अग्गंबाई सूनबाई ही मालिका आता संपणार असल्यामुळे देवमाणूस ही मालिका रात्री साडेआठ वाजता हलवली जाण्याची शक्यता आहे.

Devmanus serial
झी मराठीच्या आगामी ‘ती परत आलीय’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित, देवमाणूस बंद होण्याच्या चर्चांना ऊत  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • टीआरपीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे देवमाणूस
  • नव्या पात्राचा नुकताच झाला आहे मालिकेत प्रवेश
  • कलर्स मराठीला शह देण्यासाठी वेळात केला बदल?

मुंबई: झी मराठी (Zee Marathi) वाहिनीने काल ‘ती परत आलीय’ या आगामी मालिकेचा (upcoming serial) प्रोमो (promo) प्रदर्शित केल्यानंतर या वाहिनीवरची लोकप्रिय मालिका (famous serial) देवमाणूस (Devmanus) बंद (close) होण्याच्या चर्चांना (discussions) पुन्हा एकदा उधाण आले आहे. ‘ती परत आलीय’ ही मालिका येत्या 16 ऑगस्टपासून रात्री साडेदहा वाजता प्रेक्षकांच्या (audience) भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या या वेळेला दाखवली जाणारी देवमाणूस मालिका बंद होण्याच्या चर्चा सोशल मीडियावर (social media) सुरू झाल्या आहेत. दिग्गज अभिनेते (senior actor) विजय कदम (Vijay Kadam) या नव्या मालिकेच्या प्रोमोत दिसत आहेत.

टीआरपीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे देवमाणूस

सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका रात्री साडेदहाच्या वेळेत टीआरपीच्या स्पर्धेत सर्वात वरच्या स्थानी आहे. झी मराठीवरची अग्गंबाई सासूबाई ही मालिका पुढच्या महिन्यात संपणार आहे. तसेच या वाहिनीवरच्या इतर मालिका टीआरपीच्या स्पर्धेत पिछाडीवर आहेत. देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता ही मालिका बंद करण्याची जोखीम वाहिनी घेणार नाही. त्याऐवजी अग्गंबाई सासूबाईच्या वेळी म्हणजेच रात्री साडेआठ वाजताची वेळ या मालिकेला देऊन त्याजागी नवी मालिका आणण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

नव्या पात्राचा नुकताच झाला आहे मालिकेत प्रवेश

देवमाणूस या मालिकेत मागच्याच आठवड्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेत वहिनीसाहेबांची व्यक्तिरेखा साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी पवार हिचा प्रवेश झाला आहे. जर ही मालिका बंदच करायचा वाहिनीचा मानस होता तर या नव्या पात्राचा प्रवेश झाला नसता. झी मराठी वाहिनीवर रात्री साडेदहाच्या वेळी रहस्यमय, थरारक विषयांवरच्या मालिका दाखवल्या जातात. याच धर्तीवर असण्याची शक्यता ती परत आलीये या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे आणि त्यासाठी देवमाणूस मालिकेची वेळ बदलली जाण्याची शक्यता आहे.

कलर्स मराठीला शह देण्यासाठी वेळात केला बदल?

वाहिन्यांमधल्या टीआरपी आणि लोकप्रियतेच्या स्पर्धा आपल्याला माहिती आहेतच. कलर्स मराठी या वाहिनीवर लवकरच बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू होणार आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग बराच मोठा आहे. या कार्यक्रमाची वेळ अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र सामान्यतः रात्री दहानंतर कार्यक्रम दाखवला जाईल आणि यामुळे देवमाणूस या मालिकेला धक्का बसू शकतो. त्यामुळे मालिकेची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या संभाव्य वेळेतच नवी मालिका सुरू करून प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्याचाही वाहिनीचा डाव असू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी