Ranbazar trailer launch : 'रानबाजार' या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. सोशल मीडियावर या वेबसीरिजची खूपच चर्चा आहे. वेबविश्वाला हादरवून टाकणारा 'रानबाजार' असंही या वेबसीरिजला म्हटलं जातं आहे. या सीरिजचा विषय खूपच बोल्ड आहे. मराठी वेब विश्वात पहिल्यांदाच इतका बोल्डनेस दाखण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय.
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा रानबाजार या वेबसीरीजा टीझर रिलीज झाला होता. त्यात प्राजक्ता माळीचा बोल्ड लूक पाहून प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. सोज्वळ आणि सात्विक अशी इमेज असलेली प्राजक्ता पहिल्यांदाच इतक्या हटके लूकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. रेगे आणि ठाकरे या चित्रपटांच्या यशानंतर अभिजीत पानसे यांची रानबाजार ही वेबसीरीज रिलीज होणार आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या टीझरमध्ये तिचा बोल्ड लूक कसा असेल याची झलक प्रेक्षकांसमोर आलेलीच होती. यामुळे प्राजक्ता माळीला ट्रोलही करण्यात आले होते. तर दुसरीकडे तेजस्विनी पंडीतही बोल्ड भूमिकेत दिसत आहे. तेजस्विनीचा हा लूक पाहून चाहत्यांनी तिलाही ट्रोल केले होते. मात्र, 'माझ्या पाठीशी माझे कुटुंब भक्कमपणे उभं आहे, आणि नुसता टीझर पाहून अशाप्रकारे ट्रोल करण्याआधी वेबसीरिज पाहा आणि मग ठरवा काय ते असंही तेजस्विनीने ट्रेलर लाँचच्यावेळी सांगितले. 'ट्रोलर्सकडे मी लक्ष देत नाही असंही तेजस्विनीने आवर्जून सांगितले. कामाची, भूमिेकेची ती गरज असल्याचा उल्लेखही तिने केला. ' एकीकडे या दोघींना काही चाहत्यांनी ट्रोल केलं होतं. तर काहींनी त्यांच्या या भूमिकेचं
कौतुकही केले आहे.
पॉलिटिकल-क्राइम विषयावर आधारित अशी वेबसीरिजची मांडणी आहे. विषयावरून, आणि ट्रेलरवरूनच त्याची मांडणी किती बोल्ड असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. मराठी वेबसीरिजच्या विश्वात इतका बोल्ड, संवेदनशील विषय हातळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. सत्य घटनांचा संदर्भ या वेबसीरिजमध्ये घेण्यात आल्याचं कळतंय.
या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर डॉ. मोहन आगाशे, मोहन जोशी, सचिन खेडेकर,
अनंत जोग, जयंत सावरकर, मकरंद अनासपूरे, वैभव मांगले, माधुरी पवार, उर्मिला कानेटकर, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, नम्रता गायकवाड, अशी तगडीआणि मराठीतील आघाडीची स्टारकास्ट या वेबसीरिजमध्ये आहे.
मराठी विश्वातील आजवरची सगळ्यात बोल्ड वेबसीरिज असल्याचं म्हटलं जातंय. रेगे, ठाकरे असे संवेदनशील विषय सिनेमातून मांडणारे अभिजीत पानसे दिग्दर्शनाची धुरा वाहण्यासोबतच वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतही दिसणार आहेत. त्यामुळे आता ही वेबसीरिज मराठी सिनेसृष्टीत काय धुराळा उडवते ते 20 तारखेला वेबसीरिज रिलीज झाल्यावर कळेलंच.