एका एपिसोडसाठी तब्बल इतके रूपये घेतो रणविजय सिंह, जाणून घ्या रोडीजच्या स्टार कास्टची फी

मालिका-ए-रोज
Updated Apr 19, 2019 | 12:19 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

रोडीजचा १६वा सीझन रोडीज रिअल हिरोज ७ एप्रिलपासून सुरू झाला आहे. यात रणविजय, प्रिन्स नरूला, नेहा धुपिया, रफ्तार आणि संदीप सिंह यांचा सहभाग आहे. तुम्हाला माहीत आहे का या सेलिब्रेटीना किती फी मिळते?

rodies
रोडीज 

मुंबई: रिअॅलिटी शो रोडीज हा तरूणाईवर आधारित जुना रिअॅलिटी शो आहे. रोडीजचा पहिला हंगाम २००३मध्ये आला होता. या शोमध्ये जुळे भाऊ रघू आणि राजीव यांची जोडी प्रसिद्ध झाली होती. या शोमुळे आयुष्यमान खुराना सारखा अभिनेता बॉलिवूडला मिळाला. रोडीजचा १६वा हंगामा रोडीज रिअल हिरोज ७ एप्रिलपासून सुरू झाला आहे. यात रणविजय, प्रिन्स नरूला, नेहा धुपिया, रफ्तार आणि संदीप सिंह आहेत. तुम्हाला माहीत आहे का या सेलिब्रेटीना किती फी मिळते?

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranvijay Singh (@_ranvijay_singha_) on

 

 

 

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये रोडीजमधील या सेलिब्रेटीची फीचा खुलासा झाला. या शोचा होस्ट रणविजय सिंहला सर्वाधिक फी मिळते. तो एका एपिसोडसाठी ११ ते १२ लाख रूपये घेतो. तर बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया एका एपिसोडसाठी सात लाख रूपये घेते. रोडीज आणि बिग बॉसचा विनर प्रिन्स नरूला नेहा धुपिया प्रमाणेच एका एपिसोडसाठी सात लाख रूपये घोते. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंह या हंगामासाठी प्रति एपिसोड चार लाख घेतो. 

रणविजयनंतर निखिलला सर्वाधिक फी

रणविजयनंतर सगळ्यात जास्त फी म्युझिशियन आणि डीजे निखिल चिनापाला मिळते. रिपोर्टनुसार निखिल एका एपिसोडसाठी ९ लाख घेतो. याशिवाय रॅपर रफ्तार २०१८ पासून रोडीजशी जोडलेला आहे. रफ्तार एका एपिसोडसाठी ४.५ लाख रूपये घेतो. १६व्या सीझनमध्ये रणविजय रिंगमास्तरच्या भूमिकेत होता. तर या सीझनमध्ये नेहा धुपिया, रफ्तार, प्रिन्स नरूला, निखिल चिनापा आणि संदीप सिंग गँग लीडर्सच्या भूमिकेत आहेत. यात संदीप सिंह नवा गँगलीडर आहे. 

 

 

आतापर्यंत रोडीडचे विनर

हंगाम विजेते
पहिला(२००३) रणविजय सिंह
दुसरा(२००४) आयुषमान खुराना
तिसरा(२००५) पारुल शाही
चौथा(२००६) अँथनी
पाचवा(२००७) आशुतोष कौशिक
सहावा(२००८) नोमन सैत
सातवा(२००९) अन्वर सईद
आठवा(२०१०) आंचल खुराना
नववा(२०११) विकार खोकर
दहावा(२०१२) पलक जोहल
११वा (२०१४) निखिल सचदेव
१२वा(२०१५) प्रिन्स नरूला
१३वा(२०१६) बलराज सिंह खेहरा
१४वा(२०१७) श्वेता मेहता
१५वा(२०१८) कौशिक ठाकुर पुंडीर

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
एका एपिसोडसाठी तब्बल इतके रूपये घेतो रणविजय सिंह, जाणून घ्या रोडीजच्या स्टार कास्टची फी Description: रोडीजचा १६वा सीझन रोडीज रिअल हिरोज ७ एप्रिलपासून सुरू झाला आहे. यात रणविजय, प्रिन्स नरूला, नेहा धुपिया, रफ्तार आणि संदीप सिंह यांचा सहभाग आहे. तुम्हाला माहीत आहे का या सेलिब्रेटीना किती फी मिळते?
Loading...
Loading...
Loading...