रात्रीस खेळ चाले फेम हा कलाकार पडलाय प्रेमात

मालिका-ए-रोज
Updated May 20, 2019 | 19:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

रात्रीस खेळ चाले फेम अभिनेता आदिश वैद्यने सोशल मीडियावरून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्याने इन्टाग्रामवर आपल्या गर्लफ्रेंडचा फोटोही शेअर केला आहे.

adish vaidya
आदिश वैद्य  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: रात्रीस खेळ चाले २ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती मिळत आहे. या सिनेमातील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेतील शेवंता आणि अण्णा यांची केमिस्ट्री लोकांना चांगलीच आवडत आहे. रात्रीस खेळ चाले २ ही मालिका रात्रीस खेळ चाले मालिकेचा आधीचा भाग आहे. या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. 

कोकणातील निसर्ग, तेथील भाषा, माणसे यामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्रे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. यातील आठवणीत राहणारे एक पात्र म्हणजे आर्चीस. आर्चीस हा शहरात वाढलेला त्यामुळे गावातील वातावरण त्याला आवडू लागते. गावातील अण्णांच्या घरातील भुताचा खेळ यावर रंगलेली ही मालिका होती. 

या मालिकेत आर्चीसची भूमिका आदिश वैद्यने साकारली होती. या मालिकेने त्याला घरांघरात पोहोचवले. त्याचे चाहते नक्कीच त्याला आताच्या मालिकेसाठी मिस करत असतील. रात्रीस खेळ चाले फेम आर्चीस अर्थात आदिश वैद्यने नुकताच आपल्या पर्सनल लाईफबद्दल सोशल मीडियावरून खुलासा केला आहे. आदिशने सोशल मीडियावरून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवरून त्याने याबाबतची माहिती आपल्या फॅन्सना दिली आहे. 

आदिश रेवती लेले हिच्यासोबत अफेयरमध्ये आहे. त्याने रेवतीसोबतचे अनेक फोटोही इन्स्ट्ग्रामवर अपलोड केले आहेत. नुकताच त्याने एख फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यात आदिश त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आहे. या पोस्टला कॅप्शन लिहिताना त्याने म्हटलंय,  मेरे गर्लफ्रेंड की भाई की शादी...

मेरे गर्लफ्रेंड के भाई की शादी? @me_revati @lelesameer

A post shared by Adish Vaidya (@adishofficial) on

Hi.?? Picture Credit: The talented @sarrikaaaaaa Loved this shot darling ! ?

A post shared by Adish Vaidya (@adishofficial) on

आदिशची गर्लफ्रेंड रेवती कथ्थक डान्सर आहे. यासोबतच ती अभिनेत्रीही आहे. याआधीही अनेकदा आदिशने रेवतीसोबतचे फोटो शेअर करताना आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. कामाच्या बाबत बोलायचे झाल्यास आदिशने रात्रीस खेळ चाले या मालिकेनंतर कुंकू, टिकली आणि टॅटू तसेच लक्ष्मी सदैव मंगलम या सिनेमात काम केले होते. तर रेवतीने वर्तुळ या मालिकेत काम केले आहे. 

? @me_revati

A post shared by Adish Vaidya (@adishofficial) on

रात्रीस खेळ चाले २ ची शेवंता फेमस

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या भागात शेवंताची एंट्री प्रेक्षकांना पहायला मिळाली. पहिल्या भागात शेवंताच्या केवळ नावाचा उल्लेख होता. मात्र दुसऱ्या भागात शेवंताचा उलगडा झाला आहे.  या शेवंताने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. अण्णा आणि शेवंता यांच्या केमिस्ट्रीने मालिका चांगलीच रंगात आली आहे. अपूर्वा नेमळेकर ही अभिनेत्री शेवंताची भूमिका साकारत आहे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
रात्रीस खेळ चाले फेम हा कलाकार पडलाय प्रेमात Description: रात्रीस खेळ चाले फेम अभिनेता आदिश वैद्यने सोशल मीडियावरून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्याने इन्टाग्रामवर आपल्या गर्लफ्रेंडचा फोटोही शेअर केला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह