मनोरंजन क्षेत्रातील 5 रंजक बातम्या

मालिका-ए-रोज
Updated Aug 08, 2020 | 18:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

टीव्ही विश्वातले हे कलाकार नेहमीच मालिकांमधून, रिअॅलिटी कार्यक्रमांमधून आपल्याला भेटत असतात. पण त्यापलीकडेही त्यांचे एक आयुष्य असते. काय करतात आपले हे लाडके कलाकार खऱ्या आयुष्यात, जाणून घ्या.

archna singh
मनोरंजन क्षेत्रातील 5 रंजक बातम्या  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: ‘द कपिल शर्मा शो’ या टीव्हीवरच्या कार्यक्रमात अर्चना पूरण सिंह आणि परमीत सेठी यांच्या जोडीची चर्चा अनेकदा होते. आता खुद्द परमीत यांनीच या कार्यक्रमात पाहुणा म्हणून येऊन या जोडीचे गुपित सांगितले. ही पूर्ण हकिकत सांगताना ते म्हणाले, ‘आम्ही रात्री 11 वाजता एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सरळ लग्नासाठी गुरुजींच्या शोधात बाहेर पडलो. साधारण 12 वाजता आम्हांला गुरुजी मिळाले. त्यांनी आम्हांला विचारले की तुम्ही पळून जाऊन लग्न करत आहात पण मुलगी सज्ञान आहे ना? यावर मी म्हणालो की माझ्यापेक्षा सज्ञान आहे मुलगी! तेव्हां ते म्हणाले की लग्न असे नाही होत. आधी मुहूर्त काढू. आम्ही त्याच रात्री त्यांना पैसे दिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता आम्ही लग्न केले.’

अमृता खानविलकरने दिल्या शुभेच्छा

‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमधली स्पर्धक ऋतुजा जुन्नारकर हिने अशी लावणी सादर केली की अभिनेत्री अमृता खानविलकरलाही तिचे कौतुक केल्याशिवाय राहावले नाही. एका खास व्हीडियो संदेशात तिने म्हटले आहे, ‘मी ऋतुजाचे सादरीकरण पाहिले. मी इतकेच सांगू इच्छिते की फक्त महाराष्ट्रातलेच नाही, तर संपूर्ण देशातील लोक तुझ्या कलेचे कौतुक करत आहेत. तू तुझ्या सादरीकरणाने तू लोकांचे मन जिंकून घेतले आहेस. मला गर्व वाटतो की तू इतक्या मोठ्या मंचावर इतक्या सुरेख पद्धतीने महाराष्ट्राचे लोकनृत्य सादर केलेस. मी तुला शुभेच्छा देते. अशीच उत्तम सादरीकरणे करत राहा.’

घरातच चित्रित केला ‘इंडियन आयडल’चा प्रोमो

‘इंडियन आयडल’ या रिअॅलिटी कार्यक्रमाचा 12वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. आणि याच्या परीक्षकांपैकी एक विशाल दादलानीने याचा एक प्रोमो आपल्या घरीच चित्रित केला आणि स्पर्धकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले. घरीच प्रोमो शूट करण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल सांगताना विशाल यांनी सांगितले, ‘जेव्हां मला या कार्यक्रमाबद्दल विचारण्यात आले तेव्हां मी प्रचंड उत्साहित झालो आणि या परिस्थितीत काम कसे करायचे या विचाराने थोडा चिंतितही झालो. पण, जेव्हां माझ्या टीमने मला सांगितले की यावेळी सर्व प्रक्रिया डिजिटल होणार आहे, तेव्हां मला हा एक उत्तम पर्याय असल्याचे लक्षात आले. तीन जणांची टीम पूर्ण सुरक्षा आणि सावधानी बाळगून माझ्या घरी आले आणि आम्ही पूर्ण सुरक्षित पद्धतीने कार्यक्रमाचा प्रोमो चित्रित केला.’

कनिकाला येत आहे आजीची आठवण

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सुरक्षा नियमांमुळे टीव्हीवरील मालिकांच्या सर्व कलाकारांना एकत्र चित्रीकरण करता येत नाही आहे. ‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेतील अभिनेत्री कनिका मान हिला आपल्या ऑनस्क्रीन आजी दलजीत सौंध यांची फार आठवण येत आहे. ती म्हणते, ‘हे आमचे दुर्भाग्य आहे की आम्ही सेटवर आजींना पाहू शकत नाही. कोरोनाच्या संसर्गाचा धोका मी समजू शकतके आणि त्यांची सुरक्षा यावेळी महत्वाची आहे. पण तरीही मला सेटवर त्यांची खूप आठवण येते. त्या खूप सकारात्मक राहायच्या आणि वातावरण आनंदी ठेवायच्या. परिस्थिती सुधारल्यानंतर लवकरच आम्ही सेटवर आजींना पाहू शकू अशी मी आशा करते.’

‘मेरे डॅड की दुल्हन’मध्ये अंबरचे मन मोडले

‘मेरे डॅड की दुल्हन’ या टीव्हीवरच्या लोकप्रिय मालिकेत अभिनेता वरूण बडोला अंबरची भूमिका साकारत आहे. ही एका मुलीच्या आणि तिच्या वडिलांच्या नात्याची कहाणी आहे, ज्यात मुलगी आपल्या वडिलांसाठी एका नवरीच्या शोधात आहे. अंबरच्या आयुष्यातून गुनीत निघून गेली आहे आणि यामुळे त्याला फारच दुःख झाले आहे. या भावना आपल्या खऱ्या आयुष्याशी जोडत वरूण यांनी सांगितले, ‘साधारणतः मला माझ्या भावनांची कल्पना असते. या भावना कशाप्रकारे काम करतात हे मला माहीत आहे. पण, जेव्हां मला वाईट वाटते तेव्हा मी त्याबद्दल माझी पत्नी राजेश्वरीशी बोलतो. ती फक्त माझी पत्नी नाही, तर मला खूप चांगल्या प्रकारे समजून घेणारी माझी मैत्रीणही आहे. तिच्यासारखी पत्नी लाभल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.’ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी