'बिग बॉस १४'ची विजेती 'छोटी बहू' रुबीना दिलैक

बिग बॉस या 'रिअॅलिटी शो'च्या चौदाव्या सीझनची विजेती जाहीर झाली. 'छोटी बहू' फेम रुबीना दिलैक 'बिग बॉस १४'ची विजेती झाली.

Rubina Dilaik Bigg Boss 14 Winner and Rahul Vaidya first runner-up
'बिग बॉस १४'ची विजेती 'छोटी बहू' रुबीना दिलैक 

थोडं पण कामाचं

  • 'बिग बॉस १४'ची विजेती 'छोटी बहू' रुबीना दिलैक
  • राहुल वैद्य 'बिग बॉस १४'चा पहिल्या क्रमांकाचा उपविजेता
  • निक्की तांबोळी 'बिग बॉस १४'ची दुसऱ्या क्रमांकाची उपविजेती

मुंबईः बिग बॉस या 'रिअॅलिटी शो'च्या चौदाव्या सीझनची विजेती जाहीर झाली. 'छोटी बहू' फेम रुबीना दिलैक 'बिग बॉस १४'ची विजेती झाली. राहुल वैद्य 'बिग बॉस १४'चा पहिल्या क्रमांकाचा उपविजेता झाला. निक्की तांबोळी 'बिग बॉस १४'ची दुसऱ्या क्रमांकाची उपविजेती झाली. विजेत्या रुबीनाला ३६ लाख रुपये आणि ट्रॉफी या स्वरुपात पुरस्कार देण्यात आला. (Rubina Dilaik Bigg Boss 14 Winner and Rahul Vaidya first runner-up)

कलर्स या हिंदी टीव्ही चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या 'बिग बॉस' या 'रिअॅलिटी शो'च्या चौदाव्या सीझनचा ग्रँड फिनाले रविवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री पार पडला. या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकाची घोषणा झाली. विजेत्या स्पर्धकाच्या घोषणेआधी दहा मिनिटांसाठी 'लाइव्ह व्होटिंग' पार पडले. लाइव्ह मतदान होण्याआधीच 'बिग बॉस' या 'रिअॅलिटी शो'चा होस्ट अभिनेता सलमान खान याने निक्की तांबोळी दुसऱ्या क्रमांकाची उपविजेती असल्याचे जाहीर केले. यानंतर विजेता स्पर्धक निश्चित करण्यासाठी 'लाइव्ह व्होटिंग' झाले. 'लाइव्ह व्होटिंग'च्या आधारे रुबीना दिलैक विजयी झाली आणि राहुल वैद्य पहिल्या क्रमांकाचा उपविजेता झाला.

ग्रँड फिनालेमध्ये राखी सावंत हिने १४ लाख रुपये घेऊन 'बिग बॉस'च्या बंगल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर सलमान खानने जाहीर केलेल्या निर्णयानुसार अली गोनी 'बिग बॉस'च्या बंगल्यातून बाहेर पडला. 

'बिग बॉस १४'च्या ग्रँड फिनालेमध्ये नोरा फतेही, रितेश देशमुख, माधुरी दीक्षित, धर्मेश, सलमान, तुषार कालिया आणि धर्मेंद्र पाहुणे म्हणून सहभागी झाले. तसेच चौदाव्या सीझनमध्ये सहभागी झालेले पण ग्रँड फिनालेच्या आधी 'बिग बॉस'च्या बंगल्यातून बाहेर पडलेले सर्व स्पर्धक ग्रँड फिनालेच्या निमित्ताने उपस्थित होते. 

राखी सावंतने 'बिग बॉस १४'च्या ग्रँड फिनालेमध्ये स्वतःच्या निवडक गाण्यांवर नृत्य केले. यानंतर अली गोनी आणि जॅस्मिन यांनी रोमँटिक डान्स सादर केला. अली गोनी आणि राहुल वैद्य या दोघांनी मिळून एक परफॉर्मन्स सादर केला. नंतर रुबीना दिलैक आणि राहुल वैद्य यांनी परफॉर्मन्स सादर केला.

'अब पलटेगा सीन क्योंकी बिग बॉस देगा २०२० को जवाब' अशी 'बिग बॉस १४'ची संकल्पना होती. या 'बिग बॉस'च्या चौदाव्या सीझनमध्ये अभिनव शुक्ला, एजाज खान, राहुल वैद्य, पवित्र पुनिया, जास्मीन भसीन, निक्की तांबोळी, शहजाद देओल, जान कुमार सानू, रुबीना दिलैक, निशांतसिंग मलकानी आणि सारा गुरपाल सहभागी झाले होते. सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि राखी सावंत यांच्यासह काही सिनिअर्सनी नंतर 'बिग बॉस'च्या बंगल्यात प्रवेश केला होता. टप्प्याटप्प्याने स्पर्धक 'बिग बॉस'च्या बंगल्यातून बाहेर पडले. अखेर ग्रँड फिनालेच्यावेळी झालेल्या 'लाइव्ह व्होटिंग'च्या आधारे रुबीना दिलैकला विजयी जाहीर करण्यात आले. राहुल वैद्य पहिल्या क्रमांकाचा उपविजेता झाला.

'बिग बॉस १४' या 'रिअॅलिटी शो'चा होस्ट अभिनेता सलमान खान याने विजेत्या स्पर्धकाची घोषणा केली. यानंतर प्रचंड जल्लोष झाला. ग्रँड फिनालेच्या निमित्ताने नोरा फतेहीचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स सादर झाला. 

'बिग बॉस'चा ग्रँड फिनाले डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. 'बिग बॉस १४' या 'रिअॅलिटी शो'चा होस्ट अभिनेता सलमान खान याने सोहळ्यात रंग भरले. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या सोहळ्यात शेवटही तितकाच उत्कंठावर्धक राहिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी