Rupali Bhosale : ... संजनाचा लूक चेंज? नवीन लूक पाहून चाहते संभ्रमात

मालिका-ए-रोज
Updated Sep 17, 2022 | 15:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rupali bhosale : 'आई कुठे काय करते' (Aai kuthe kay karate) या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी संजना अर्थातच रुपाली भोसले (Rupali Bhosale ). तिचा नवीन लूक (New look) पाहून चाहते पुरते संभ्रमात पडले आहेत. काय आहे तिच्या या नव्या लूक मागचं रहस्य? चला जाणून घेऊया.

Rupali Bhosale did new haircut change her look video viral on Social media
काय आहे संजनाच्या नव्या लूकमागचं रहस्य?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'आई कुठे काय करते' मालिकेती संजना अर्थातच रुपाली भोसलेचा लूक चेंज
  • संजनाच्या नव्या लूकमुळे चाहते संभ्रमात
  • संजना अर्थातच रुपाली भोसलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Rupali bhosale New look: स्मॉल स्क्रीनवरील सध्याच्या घडीला टॉपवर असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (Aai kuthe kay karate) . या मालिकेतील 
अरुंधतीच्या पात्राला अफाट लोकप्रियता मिळालेली आहे. तेवढीत लोकप्रियता मालिकेत खलनायिका साकारणाऱ्या संजनालासुद्धा मिळाली. अभिनेत्री रुपाली भोसले  (Rupali Bhosale ) या मालिकेत संजनाच्या भूमिकेत दिसत आहे. हिंदी मालिका, बिग बॉस मराठीमध्ये रुपालीला आपण पाहिलंय. मात्र, तिला घराघरात पोहोचवलं ते 'आई कुठे काय करते' या मालिकेतील संजनाच्या भूमिकेने. अशी ही संजना म्हणजेच रुपाली सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. आपली सिक्रेट्स , आपली रहस्य ती कायम चाहत्यांसोबत शेअर करते. सध्या तिचा एक लूक सोशल मीडियावर व्हायरल (Video viral on social media ) होत आहे. तिचा हा लूक पाहून 'कोण होतीस तू , काय झालीस तू' असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, या लूकमध्ये रुपालीला ओळखणं चाहत्यांना खरंच कठीण होत आहे. (Rupali Bhosale did new haircut change her look video viral on Social media)


मालिकेत कायम पारंपरिक लूकमध्ये दिसणाऱ्या संजनाला या लूकमध्ये पाहून चाहत्यांना मोठा धक्काचं बसलाय. सोशल मीडियावर बिफोर अँड आफ्टर असा लूक रुपालीने शेअर केलेला आहे. रुपाली तिचे फोटोज सोशल मीडियावर कायम शेअर करत असते. तिचे हे फोटो बऱ्याचदा पारंपरिक वेशात असतात. मात्र, सध्या तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती हटके लूकमध्ये दिसत आहे. बऱ्याच कालावधीनंतर तिने आपला लूक चेंज केलेला आहे. रुपालीने नवीन हेयरकट केला आहे. सोशल मीडियावर बिफोर अँड आफ्टर असा व्हिडीओ शेअर केला आहे. रूपालीने खूपच शॉर्ट हेयरकट  केला आहे. 'या हेअरकटमुळे लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला' असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. 

तिचा हा लूक चेंज काहींना आवडलाय तर काहींनी मात्र तिच्या या लूकवर नाराजी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने म्हटलंय, "पण अस का? तसा हा लूक पण छान दिसतोय". तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट करत म्हटलंय, "तुम्हाला लांब केसच शोभून दिसतात, कशाला हा खटाटोप?" तर काहींनी रुपालीच्या या लूक चेंजमुळे आता ती आई कुठे काय करते या मालिकेतून ब्रेक घेणार आहे का असाही प्रश्न रुपालीला विचारलाय. 

दरम्यान, बिग बॉस 4 मध्ये गेस्ट म्हणून जायला आवडेल असंही काही दिवसांपूर्वीच रुपालीने म्हटलं होतं. त्यामुळे आता हा हेअरकट नक्की कशासाठी केलाय. रुपालीचा हा लूक 'आई कुठे काय करते' मालिकेत काही नवीन ट्विस्ट आणणार का याचीच प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी