Rupali Ganguly Talk about her Weight Gain after Delivery: असं म्हणतात की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला काही मिळत नाही आणि नशीब बदलायलाही वेळ लागत नाही. वर्षानुवर्षे इंडस्ट्रीत कार्यरत असलेली रुपाली गांगुली (Rupali Ganguly)हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. वर्षानुवर्षे काम करूनही रुपाली गांगुलीला ती योग्य ओळख मिळाली नाही, जी अनुपमाने (Anupamaa) तिला मिळवून दिली. अल्पावधीतच अनुपमाने प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवले. मात्र, एकेकाळी रुपालीला तिच्या वाढलेल्या वजनामुळे लोकांकडून टोमणेही ऐकायला मिळाले होते. ( Rupali ganguly listened taunts after her weight gain)
2015 साली रुपाली गांगुलीने मुलगा रुद्रांशला जन्म दिला होता तेव्हाची ही घटना असेल. एका मुलाखतीत रुपालीने सांगितले की, प्रसूतीनंतर ती काही कारणास्तव मुलाला दूध पाजू शकली नाही. त्यावेळी तिचे वजन फक्त 58 किलो होते, मात्र काही महिन्यांतच तिचे वजन 86 किलोपर्यंत पोहोचले.अशा परिस्थितीत जेव्हा ती आपल्या मुलाला घेण्यासाठी घराबाहेर पडली तेव्हा तिला पाहून लोक थक्क झाले. 'तू मोनिषा आहेस ना, इतकी लठ्ठ कशी झाली आहेस' असे लोकं म्हणायचे. तिचे शेजारी अनेकदा तिच्या वाढलेल्या वजनाबद्दल बोलायचे आणि तिला दोन गोष्टीही सांगायचे. त्यावेळी रुपालीलाही खूप वाईट वाटायचे आणि तिलाही राग यायचा.
अधिक वाचा : लय भारी ! दे धक्का २ चा ट्रेलर आऊट
आज रुपाली गांगुलीने आपलं वजन खूपच कमी केले आहे. विशेष म्हणजे टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. अनुपमाच्या यशानंतर रुपाली गांगुलीच्या फीमध्ये मोठी वाढ झाली होती. पूर्वी ती एका एपिसोडसाठी दीड लाख रुपये घेत असे, आज तिची फी दुप्पट झाली आहे. ती एका एपिसोडसाठी 3 लाख रुपये घेत आहे.
अधिक वाचा : रामनाथ कोविंद बनणार सोनिया गांधींचे शेजारी
रुपाली गांगुलीला अनुपमाने नाव आणि प्रसिद्धी दोन्ही दिलं. आजही टीआरपीच्या यादीत अनुपमा वरचढ आहे. अनुपमा या मालिकेने इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये घेतलेली रुपालीची मेहनत फळाला आली असंही रुपालीने एका मुलखातीत सांगितले होते. याआधी रुपालीने हिंदी स्मॉल स्क्रीनवर अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारलेल्या आहेत.