Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये ट्विस्ट,आता'हा' अभिनेता दिसणार तारक मेहताच्या भूमिकेत

मालिका-ए-रोज
Updated Sep 12, 2022 | 15:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : स्मॉल स्क्रीनवरील गाजलेली मालिका'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेता शैलेश लोढाने (Shailesh Lodha) नुकाताच मालिकेचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आता तारक मेहताची जागा कोण घेणार याचीच उत्सुकता आहे. मात्र, मालिकेत तारक मेहताची जागा सचिन श्रॉफ (Sachin Shroff) साकारणार असल्याची बातमी येत आहे.

Sachin shroff replace shailesh lodha in Tarak Mehta ka ulta chashmah
तारक मेहताच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शैलेश लोढा यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचा घेतला निरोप
  • तारक मेहताच्या भूमिकेत दिसणार सचिन श्रॉफ
  • सचिन श्रॉफ स्मॉल स्क्रीनवरील सेलिब्रिटींपैकी एक आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही सर्वात जास्त चालणारी मालिका आहे. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील एक एक कलाकार आता मालिका सोडून जात आहेत. तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी शोचा निरोप घेतला. त्यानंतर आता त्यांची भूमिका कोण साकारणार याची सारेच जण वाट पाहात होते. मात्र, आता अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff)तारक मेहताच्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Sachin shroff replace shailesh lodha in Tarak Mehta ka ulta chashmah tv serial )

अधिक वाचा : Cricketer: या भारतीय खेळाडूने मुस्लिम मुलीशी केला होता विवाह

या अभिनेत्याने केले रिप्लेस

मालिकेतील शैलेश लोढाच्या भूमिकेसाठी सचिन श्रॉफ या अभिनेत्याचे नाव फायनल झाले आहे. ETimes च्या बातमीनुसार, प्रॉडक्शन हाऊसने केवळ नवीन अभिनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले नाही तर त्यांनी शोचे शूटिंग देखील सुरू केले आहे. शैलेश लोढा यांच्या जागी सचिन श्रॉफ आता तारक मेहताची भूमिका साकारणार आहेत. सचिन श्रॉफ यांनी शूटिंगसुद्धा सुरू केले आहे. 

अधिक वाचा : मुलांचे दात किडतायत? टेन्शन घेऊ नका!

सचिन श्रॉफने स्मॉल स्क्रीनवरील अनेक मालिका आणि रिएलिटी शोमध्ये काम केलेलं आहे. तो अखेरचा बॉबी देओल स्टारर आश्रम आणि टीव्ही शो गुम है किसी के प्यार में दिसला होता. सलमान खानच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या ५व्या सीझनमध्येही तो दिसला होता.

या कारणामुळे शो सोडला

शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी मार्च 2022 नंतर शूटिंग थांबवले होते. करारावरून वाद झाल्याने तसेच त्यांनी दिलेल्या तारखांचा योग्प वापर शोमध्ये झाला नाही अशी त्यांची तक्रार होती. मुख्य म्हणजे या मालिकेमुळे इतर कोणताही शो शैलेश लोढा करू शकत नव्हते. त्यामुळे अखेर त्यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा सोडण्याचा निर्णय घेतला. तारक मेहताचा निरोप घेतल्यानंतर त्यांनी एका वेगळ्या वाहिनीवर 'वाह भाई वाह हा' हा शो केला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी