राधिका आपटेनंतर ही मराठी अभिनेत्री 'सेक्रेड गेम्स २' मध्ये 

मालिका-ए-रोज
Updated Aug 12, 2019 | 17:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

सर्व नेटकऱ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स २ रिलीज व्हायला आता बोटावर मोजता येईल इतके दिवस शिल्लक असताना या नव्या सिरीजमध्ये नव्या कलाकारांबाबत माहिती समोर येत आहे.

amruta subhash
सेक्रेड गेम्समध्ये दिसणार ही मराठी अभिनेत्री (सौजन्य - नेटफ्लिक्स) 

थोडं पण कामाचं

  • सेक्रेड गेम्स २ येत्या १५ ऑगस्ट रोजी होणार नेटफिक्लिक्सवर रिलीज
  • राधिका आपटेनंतर या सिरीजमध्ये दिसणार  अमृता सुभाष 
  • अनुराग कश्पला वाटते की ही नवीन सिरीज लोकांना उद्युक्त, धक्का देईल आणि आश्चर्य चकित करेल 

मुंबई :  सर्व नेटकऱ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स २ रिलीज व्हायला आता बोटावर मोजता येईल इतके दिवस शिल्लक असताना या नव्या सिरीजमध्ये नव्या कलाकारांबाबत माहिती समोर येत आहे. मागील सिरीजमध्ये मराठमोळी राधिका आपटे ही रॉ अधिकाऱ्याच्या भूमिकेत होती. तीचा यात खून होतो. आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची या सिरीजमध्ये एन्ट्री होणार आहे. यात प्रतिभावंत अभिनेत्री अमृता सुभाष आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमृता नुकतीच गली बॉय या चित्रपटात रणवीर सिंगची आई म्हणून आपल्याला दिसली होती. आता ती सिक्रेट गेम्स २ च्या सिजनमध्ये रॉ एजन्ट म्हणून दिसणार आहे. तीचे नाव के. डी. यादव असणार आहे. 

या नव्या सिझनच्या वैशिष्ट्याबाबत बोलताना गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दीकी) याने सांगितले की, अनुराग कश्यप याने पहिल्यांदा भारताबाहेर शुटिंग केले आहे. मला त्यावर विश्वास बसत नव्हता, जो पर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहचलो.  दिग्दर्शकाने ज्या ठिकाणी पहिला सिझन संपला तेथूनच दुसरा सिझन सुरू होणार आहे. एक बॉम्ब आहे आणि तो कोणत्याही क्षणी फुटणार आहे, आणि सरताजसिंगला जगाला वाचवायचे आहे. 

 

 

या सिझनमध्ये गुरूजी (पंकज त्रिपाठी) या कॅरक्टरची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच या सिझनमध्ये नवीन कॅरेक्टर येणार आहेत. यात  बताय अबेल्मन (कल्की कोचलिन) हे नवीन कॅरेक्टर दिसणार आहे. तसेच यात केनिया बेस रॉ ची एजंट म्हणून अमृता सुभाष दिसणार आहे. या पुस्तकात यादव हा पुरूष दाखवला आहे. पण सिक्रेट गेम्सच्या कथाकारने हे पात्र बदलले असून त्याला पुरूषाचे महिला पात्र केले आहे. यात शाहिद खान म्हणून रणवीर शौरी दिसणार आहे. 

 

 

सेक्रेड गेम्सच्या नव्या सिझनमध्ये काही खूप भन्नाट कॅरेक्टर दिसणार आहेत. त्यामुळे यातील रंगत अजून वाढणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
राधिका आपटेनंतर ही मराठी अभिनेत्री 'सेक्रेड गेम्स २' मध्ये  Description: सर्व नेटकऱ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स २ रिलीज व्हायला आता बोटावर मोजता येईल इतके दिवस शिल्लक असताना या नव्या सिरीजमध्ये नव्या कलाकारांबाबत माहिती समोर येत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...