‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ मालिकेची प्रश्नमंजुषा

फक्त मराठी' वाहिनीने 'साईबाबा श्रद्धा आणि सबुरी' ही मराठी मालिका महाराष्ट्रातील साई भक्तांसाठी आणली. या मालिकेत सोमवार ३ मे २०२१ पासून प्रश्नमंजुषा सुरू होत आहे.

SAI BABA SHRADDHA AANI SABURI PRASHNA MANJUSHA
‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ मालिकेची प्रश्नमंजुषा 

थोडं पण कामाचं

  • ‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ मालिकेची प्रश्नमंजुषा
  • दररोज मालिकेत विचारणार प्रश्न
  • योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना मिळणार बक्षिस

मुंबईः 'फक्त मराठी' वाहिनीने 'साईबाबा श्रद्धा आणि सबुरी' ही मराठी मालिका महाराष्ट्रातील साई भक्तांसाठी आणली. या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून अल्पावधीतच अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. वेगळ्या पण नैसर्गिक सदरीकरणामुळे ही मालिका मराठी माणसांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. या मालिकेत सोमवार ३ मे २०२१ पासून प्रश्नमंजुषा सुरू होत आहे. SAI BABA SHRADDHA AANI SABURI PRASHNA MANJUSHA

रामायण मालिकेतील 'त्या' एपिसोडने केला विक्रम

मालिकेत विचारल्या जाणाऱ्या एका सोप्या प्रश्नाचे योग्य उत्तर 8446419091 या Whatsapp नंबर वर पाठविणाऱ्या ५ भाग्यवान विजेत्यांना छोटेखानी साईमूर्ती आणि पूजा सामुग्री भेट म्हणून दिली जाईल. ही भेट शिर्डीहून थेट घरपोच पाठवली जाईल.

'फक्त मराठी' वाहिनीवर १५ मार्च २०२१ पासून 'साईबाबा श्रद्धा आणि सबुरी' या मालिकेचे प्रसारण सुरू होते. मालिकेचे शूटिंग मुंबईच्या मालाडमध्ये कलावंत स्टुडिओ येथे सुरू होते. या ठिकाणी प्रती शिर्डी उभारण्यात आली. पण कोरोना संकटामुळे १५ मे पर्यंत शूटिंग स्थगित करण्यात आले. यामुळे मालिकेच्या नव्या भागांचे प्रसारण स्थगित केले आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव १९ एप्रिल २०२१ पासून 'फक्त मराठी' वाहिनीवर पहिल्या भागापासून नव्याने मालिकेचे प्रसारण सुरू आहे. सोमवार ते शुक्रवार रोज रात्री आठ वाजता मालिकेचे प्रसारण होत आहे.

निर्बंधांमुळे अनेक साईभक्तांना शिर्डीला जाणे शक्य नाही. ते मालिका बघून समाधान मानत आहे. या प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून प्रश्नमंजुषा सुरू करण्यात आली आहे. योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना छोटेखानी साईमूर्ती आणि पूजा सामुग्री भेट म्हणून दिली जाईल. ही भेट शिर्डीहून थेट घरपोच पाठवली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी