BigBoss 15 update : वीकेंड का वारमध्ये अभिजीत बिचुकलेवर संतापला सलमान खान, तर बिचुकलेंची जीभ घसरली, शोबद्दल वापरले अपशब्द

मालिका-ए-रोज
Updated Jan 08, 2022 | 22:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

BigBoss 15 update : बिग बॉस 15 मधील वातावरण चांगलेच तापले आहे. वीकेंड का वारमध्ये सलमान खानच्या रागाचा पारा चढलेला दिसला. सलमान खानने आज स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली

Salman Khan got angry with Abhijeet Bichukale in Weekend Ka War
बिग बॉसच्या घरात रंगले युद्ध, सलमान विरुद्ध बिचुकले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस 15 च्या घरातील वातावरण तापले.
  • सलमान खान विरुद्ध अभिजीत बिचुकले असा रंगला सामना
  • अभिजीत बिचुकलेंची जीभ घसरली, अपशब्दांचा वापर


BigBoss 15 salman khan vs Bichukale : नवी दिल्ली : बिग बॉस 15 मधील वातावरण चांगलेच तापले आहे. आज वीकेंड का वारमध्ये सलमान खानच्या रागाचा पारा चढलेला दिसलासलमान खानने आज स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. इतकेच नाही तर शारीरिक हिंसाचारामुळे उमर रियाजला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. त्याचवेळी अभिजित बिचुकले यांचीही शाळा सलमान खानने घेतली. शिवीगाळ करणे अभिजित बिचुकलेला महागात पडले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस 15 च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये सलमान खान अभिजीत बिचुकलेवर राग काढला. तुमच्या कुटुंबाला घाणेरड्या शिव्या दिल्या तर तुम्हाला कसे वाटेल, असे सलमान खान म्हणाला. बिचुकलेला इशारा देताना सलमान खान म्हणाला की, जर पुन्हा असे केले तर पाहा, यावर बिचुकले उद्धटपणे बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सलमान खान त्याला मध्येच थांबवतो. तेव्हा तुझे हे वर्तन असेच राहिल्यास घरात घुसून तुला मारेन, असे सलमान खान म्हणतो. त्यानंतर मात्र, बिचुकलेंचा पारा चढतो, आणि खड्ड्यात जाऊ दे हा शो असे तो म्हणत असल्याचं दिसून आलं. अशाप्रकारे अभिजीत बिचुकलेसुद्धा सलमान खानच्या रागातून सुटणार नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

एकूणंच काय तर आता बिग बॉसच चांगलेच रंगात आलेले दिसत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आठवड्यांमध्ये हे स्पर्धक आणखी काय काय रंग दाखवणार ते येणाऱ्या भागांमध्ये दिसेलच. त्यामुळे आता उमर रियाज, आणि बिचुकलेनंतर आणखी कोण सलमान खानच्या तावडीत सापडणार आणि हा शो आणखी कसा रंग घेणार हेच पाहायचं. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी