Salman Khan in Biggboss Marathi 3: बिग बॉसच्या मराठीच्या चावडीवर येणार सलमान खान

Salman Khan in Biggboss Marathi 3: वाढणार बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार “भाईजान”... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेने बघत होते तो क्षण आता आला आहे... बिग बॉस मराठी सिझन ३ च्या चावडीवर सदस्यांना ‘सरप्राईझ’ मिळणार आहे...

Salman Khan to appear on Bigg Boss's Marathi 3 Chawdi
बिग बॉसच्या मराठीच्या चावडीवर येणार सलमान खान 
थोडं पण कामाचं
  • “मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर” – सलमान खान
  • बिग बॉस मराठीच्या सेटवर सलमान खानची धम्माकेदार एन्ट्री होणार आहे.
  • .घरातील सदस्य सलमान खानला बघून खुश तर होणारच पण त्यांची इच्छा देखील पूर्ण होणार आहे

Salman Khan in Biggboss Marathi 3 । मुंबई  : वाढणार बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार “भाईजान”... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेने बघत होते तो क्षण आता आला आहे... बिग बॉस मराठी सिझन ३ च्या चावडीवर सदस्यांना ‘सरप्राईझ’ मिळणार आहे...कारण आपल्या सगळ्यांचा लाडका, यारो का यार बॉलीवूडचा भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे... बिग बॉस मराठीच्या सेटवर सलमान खानची धम्माकेदार एन्ट्री होणार आहे...घरातील सदस्य सलमान खानला बघून खुश तर होणारच पण त्यांची इच्छा देखील पूर्ण होणार आहे असे म्हणायला हरकत नाही. तेव्हा नक्की बघा या आठवड्याची बिग बॉस मराठीची चावडी... जी रंगणार आहे खुद्द सलमान खानच्या हजेरीत. (Salman Khan to appear on Bigg Boss's Marathi 3 Chawdi)
 


नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रोमो मध्ये महेश मांजरेकर यांनी जाहीर केले, “आपल्या चावडीवर येणार आहे एक खास पाहुणा”. त्याचसोबत सलमान खानने देखील सांगितले “मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर” याचसोबत त्याने “ओ भाऊ जरा चावडीवर या” असे देखील जाहीर केले...


 
बघूया काय काय धम्माल मस्ती होणार या आठवड्याच्या बिग बॉस मराठीच्या चावडीवर शनिवार – रविवार रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी