Big boss marathi 3: संतोष चौधरी उर्फ दादूस बिग बॉसच्या घरातून बाहेर

Big boss marathi 3: बिग बॉस मराठी आता कुठे खऱ्या अर्थाने रंगात आला आहे या आठवड्यात संतोष चौधरी उर्फ दादूस घराबाहेर पडलेत.

Santosh Chaudhary aka Dadus out of Bigg Boss's house
बिग बॉसच्या घरात ट्विटस्ट अँन्ड टर्न, दादूस बिग बॉसच्या घराब  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉसमध्ये ट्विस्ट अँन्ड टर्न
  • संतोष चौधरी उर्फ दादूस बिग बॉसच्या घराबाहेर
  • आता उरलेत फक्त 8 स्पर्धक


Big boss marathi 3: बिग बॉस मराठी आता कुठे खऱ्या अर्थाने रंगात आला आहे. या आठवड्यात संतोष चौधरी उर्फ दादूस घराबाहेर पडलेत. सूत्रांनी ई-टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार दादूस या शोमधून घराबाहेर पडलेत. बिग बॉसच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बातमी नसली तरी
सदस्यांसाठी ही बातमी खरी होती. दादूस उर्फ संतोष चौधरी घरातून बाहेर पडेल असा अंदाज प्रेक्षकांना आधीच होता. मात्र, बिग बॉसच्या घरात कधी काय होईल हे सांगता येत नाही. हा शो होस्ट करणाऱ्या महेश मांजरेकर यांनीही दादूसच्या हकालपट्टीबाबत आपली निराशा व्यक्त केलीय. मात्र, हा प्रेक्षकांचा निर्णय असल्याचं मांजरेकरांनी यावेळी सांगितलं. 

'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी दादूस यांनी सर्व घरातील सहकाऱ्यांना मिठी मारली. यावेळी जय दुधाणे, गायत्री दातार, मीरा जगन्नाथ आणि उत्कर्ष शिंदे यांना निरोप देताना दु:ख झाले. दादूसनेही हसतमुखाने घरचा निरोप घेतला.

संतोष चौधरी उर्फ ​​दादूस बद्दल बोलायचे तर, ते सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक म्हणून शोमध्ये दाखल झाले.

बिग बॉस मराठी सीझन 3 ने या सीझनमध्ये त्यांच्या आगरी-कोळी भाषेने रंगत आणली.त्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते एक मराठी लोकगायक आहे जो दादूस या नावाने प्रसिद्ध आहे. त्याला सोन्याबद्दल अपार प्रेम आहे आणि त्याचे चाहते त्याला 'गोल्डमॅन दादूस' म्हणतात. दादूसने शोमध्ये आपल्या आगरी आणि कोळी गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कार्याबद्दलचे त्यांचे समर्पण आणि शोबद्दलचे प्रेम नेहमीच लक्ष वेधून घेते. काही वर्षांपूर्वी संतोष चौधरी उर्फ दादूसला वीजचोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती.

आता बिग बॉस मराठीच्या घरात उरलेत फक्त 8 स्पर्धक. त्यामुळे दिवसेंदिवस स्पर्धा अधिकच रंगतदार झालीय.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी