Little Champs meet Raj Thackeray : सारेगमप लिटिल चॅम्प्स स्पर्धकांनी घेतले राज ठाकरेंचे आशिर्वाद!

Saregama Little Champs । सारेगमप लिटिल चॅम्प्सचा महाअंतिम सोहोळ्याआधी स्पर्धकांनी घेतले राज ठाकरेंचे आशिर्वाद!

Saregampa Little Champs contestants take Raj Thackeray's blessings his new home
सारेगमप लिटिल चॅम्प्स स्पर्धकांनी घेतली राज ठाकरेंची भेट 
थोडं पण कामाचं
  • सारेगमप लिटिल चॅम्प्स  महाअंतिम सोहोळ्याआधी या ७ स्पर्धकांनी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज  ठाकरे' यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
  • हे स्पर्धक राजसाहेबांना भेटून खूप भारावून गेले. राज ठाकरेंनी या मुलांना इलेक्ट्रिक तानपुरा आणि तबला भेट दिला.
  • राज ठाकरेंनी त्यांच्या लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Raj Thackeray greet little champs : सारेगमप लिटिल चॅम्प्स  महाअंतिम सोहोळ्याआधी या ७ स्पर्धकांनी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज  ठाकरे' यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. हे स्पर्धक राजसाहेबांना भेटून खूप भारावून गेले. राज ठाकरेंनी या मुलांना इलेक्ट्रिक तानपुरा आणि तबला भेट दिला. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 पंचरत्नांचं योग्य मार्गदर्शन, मृण्मयी देशपांडे खुमासदार सूत्रसंचालन आणि १४ लिटिल चॅम्प्सचे धमाकेदार परफॉर्मन्सेस यामुळे सारेगमप लिटिल चॅम्प्सच हे नवीन पर्व गाजलं आणि अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या पर्वाला पसंती दर्शवली. या १४ स्पर्धकांचा प्रवास प्रेक्षकांनी पाहिला. या १४ अप्रतिम गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये कोण वरचढ आहे हा निर्णय घेणं पंचरत्नांसाठी सुद्धा कठीण होतं. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. 

raj thackeray little champs

 सारेगमप लिटिल चॅम्प्समधील पलाक्षी दीक्षित, ओंकार कानेटकर, गौरी गोसावी, प्रज्योत गुंडाळे, सारंग भालके, रीत नारंग आणि स्वरा जोशी हे सात स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. हे सातही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोण विजेता ठरणार हे सांगणं खूपच अवघड आहे.
 
 सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या महाअंतिम सोहळ्यात रविवार ५ डिसेंबर रोजी संध्या. ७ वा.  झी मराठीवर होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी