Bigg Boss Marathi Grand Premiere: 'बिग बॉस मराठी'च्या सीझन 4 ला सुरुवात, पाहा कोणी-कोणी केलीए एंट्री

Bigg Boss Marathi Grand Premiere Update: 'बिग बॉस मराठी'च्या सीझन 4 ला ग्रँड प्रीमिअर सुरु झाला आहे. पाहा आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धकाने एंट्री केली आहे.

season 4 of bigg boss marathi begins see which celebrities entered in bigg boss house
'बिग बॉस मराठी'च्या सीझन 4 ला सुरुवात, कोणी केलीए एंट्री? (सौजन्य: कलर्स मराठी)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
 • 'बिग बॉस मराठी'च्या सीझन 4 ला ग्रँड प्रीमिअर सुरु
 • 'बिग बॉस मराठी'च्या सीझन 4 मध्ये 16 स्पर्धक करणार घरात प्रवेश
 • बिग बॉसच्या चौथ्या सीजनमध्ये कोण मारणार बाजी?

Bigg Boss Marathi season 4: मुंबई: बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनच्या ग्रॅण्ड प्रीमिअरला (Bigg Boss Marathi season 4 Grand Premiere Live)  नुकतीच सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi) कोणाची वर्णी लागली आहे? यंदाचे स्पर्धक कोण असणार? हे आता महेश मांजरेकरांच्या चावडीवर उघड होऊ लागलं आहे. (season 4 of bigg boss marathi begins see which celebrities entered in bigg boss house)

यंदा बिग बॉसची थीम ही 'ALL IS WELL' यावर बेतलेली आहे. त्यामुळे या थीममागे नेमकं गुपित काय? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तशीच बिग बॉस मराठीचं यंदाचं घर कसं आहे हे देखील आपल्याला बिग बॉसच्या ग्रॅंड प्रीमियरमध्ये पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss Marathi Season 4 Contestant)

बिग बॉस मराठी सीजन 4 LIVE Update: 

 1. BIGG BOSS मराठीचा सोळावा स्पर्धक मॉडेल डॉ. रोहित शिंदेची घरात एंट्री

 2. BIGG BOSS मराठीची पंधरावी स्पर्धक म्हणून अभिनेत्री रुचिरा जाधवने केलं घरात पदार्पण

 3. Airtel मिस कॉल स्पर्धेचा विजेता म्हणून BIGG BOSS मराठीचा चौदावा स्पर्धक म्हणून त्रिशूल मराठे याने केलीए एंट्री

 4. सांस्कृतिक कला जोपासणारी लावणी सम्राज्ञी, अभिनेत्री मेघा घाडगे हिने तेरावी स्पर्धक म्हणून केलाय बिग बॉसच्या घरात प्रवेश


 5. बारावा स्पर्धक अभिनेता, कोरिओग्राफर विकास सावंत याने केली बिग बॉसच्या घरात एंट्री

 6. आरजे आणि अभिनेत्री अमृता देशमुख आणि यशश्री मसुरकर यांनी एकत्र परफॉर्मन्स केल्यानंतर बिग बॉसच्या घरात एकत्रच प्रवेश केला आहे.

 7. अकरावी स्पर्धक म्हणून यशश्री मसुरकर हिने बिग बॉसचा घरात प्रवेश केला आहे.

 8. बिग बॉसची दहावी स्पर्धक म्हणून अभिनेत्री अमृता देशमुख  हिने घरात एंट्री केली आहे.

 9. धिप्पाड आणि प्रचंड उंच अशी ओळख असलेला अकलूजमधील रेसलर योगेश जाधव याने नववा स्पर्धक म्हणून घरात केला प्रवेश


 10. बिग बॉसची आठवी स्पर्धक म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने घरात एंट्री केली आहे.


 11. बिग बॉसची सातवा स्पर्धक म्हणून अभिनेता अक्षय केळकर याने घरात एंट्री केली आहे.


 12. बिग बॉसची सहावी स्पर्धक म्हणून अभिनेत्री समृद्धी जाधव हिने घरात एंट्री केली आहे.


 13. बिग बॉसच्या घरात धडाकेबाज अभिनेता आणि आपल्या भूमिका कायम रोखठोकपणे मांडणाऱ्या किरण माने याने त्याच्याच स्टाइलमध्ये एंट्री केली आहे.

   
 14. निखिल राजेशिर्के आणि अमृता धोंगडे यांनी एकत्र परफॉर्मन्स करत दोघांनी एकत्रच बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.

 15. तर चौथी स्पर्धक म्हणून अमृता धोंगडे हिने घरात प्रवेश केला आहे.

 16. तिसरा स्पर्धक निखिल राजेशिर्के याने बिग बॉसचा घरात प्रवेश केला आहे.

 17. बिग बॉसच दुसरा स्पर्धक म्हणून छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद जवादे याने घरात प्रवेश केला आहे.


   
 18. बिग बॉसची पहिली स्पर्धक म्हणून अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने घरात एंट्री घेतली आहे.


 19. प्रत्येक सीजनप्रमाणेच यंदाही महेश मांजरेकर यांच्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी असणार आहे. 

 20. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनला आजपासून (2 ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे.

   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी