Shatimaan Back: ९० च्या दशकात 'शक्तिमान' या मालिकेने मुलांचे खूप मनोरंजन केले. या सुपरहिरो शोमध्ये मुकेश खन्ना यांनी शक्तीमानची भूमिका साकारली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका दुसऱ्या सीझनसह पुनरागमन करू शकते अशा बातम्या येत होत्या. पण आता मुकेश खन्ना यांनी शक्तीमानबाबत मोठा खुलासा केला आहे.
एका सुप्रसिद्ध वेबसाईटशी बोलताना मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान'बाबत अनेक गुपिते उघडली. मुकेश खन्ना म्हणाले की, 'बर्याच वर्षांनी हा प्रकल्प माझ्याकडे आला आहे.
अनेकांनी मला सांगितले की तू शक्तीमानचा दुसरा सीझन कर. पण यावेळी मला शक्तीमानला टीव्हीवर नव्हे तर चित्रपटात आणायचे होते.
मुकेश खन्ना म्हणाले की, 'मी सोनी पिक्चर्सशी बोलणी झालेली आहेत. त्यांनी ही गोष्ट सार्वजनिकही केली आहे. हा एक मोठा चित्रपट आहे. सुमारे 300 कोटींचा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. सर्व काही ठरेपर्यंत फार काही सांगता येणार नाही.
'शक्तिमान' चित्रपट म्हणून आणण्याबाबत मुकेश खन्ना म्हणाले की, 'या चित्रपटाची कथा मी माझ्या पद्धतीने तयार केली आहे. माझी त्याला एकच अट होती की कथा बदलणार नाही. शक्तीमान कोण होणार या प्रश्नाला उत्तर देताना मुकेश खन्ना म्हणाले की, दुसरा कोणी शक्तीमान झाला तर देश त्याला स्वीकारणार नाही.
जाणून घ्या 'शक्तिमान' ही मालिका का बंद झाली
काही काळापूर्वी मुकेश खन्ना यांनी मुलाखतीत 'शक्तिमान' मालिका बंद होण्याचे कारण सांगितले होते. मुकेश खन्ना म्हणाले होते की, 'शनिवारी सकाळी आणि मंगळवारी रात्री शक्तीमान ही मालिका असायची. यासाठी मी 3 लाख 80 हजार रुपये दूरदर्शनला देत असे. रविवारी जेव्हा या शोचे प्रसारण सुरू झाले तेव्हा फी 7 लाख 80 हजार इतकी झाली.
यानंतर फी वाढवून 10 लाख 80 हजार करण्यात आली. त्यानंतर ते फी 16 लाख करण्याचा विचार करत होते. मला खूप नुकसान सोसावे लागत होते म्हणून हा शो बंद करावा लागला."