Shiv thakre and Archana Gautam: शिव ठाकरे आणि अर्चना गौतम झाले BFF, म्हणाले- 'हे बिग बॉसमध्ये नसते तर...'

मालिका-ए-रोज
Updated Feb 18, 2023 | 16:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shiv Thakare and Archana Gautam : बिग बॉस १६ संपले आहे पण कंटेस्टेंट्स अजूनही  एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये धुमाकूळ करत आहेत. बिग बॉस विजेता एमसी स्टेनटच्या इंस्टाग्राम लाइव्हने नवा रेकॅार्ड  रचण्यापासून ते शिव ठाकरे यांचे त्यांच्या मूळ गावी अमरावतीत जल्लोषात स्वागत करण्यापर्यंत सर्वच जण त्याचीच चर्चा करत आहेत.

Shiv Thakre and Archana Gautam became BFFs, said- 'If it wasn't for Bigg Boss...'
Shiv thakre and Archana Gautam:शिव ठाकरे आणि अर्चना गौतम झाले BFF  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस १६ संपले आहे पण कंटेस्टेंट्स अजूनही  एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये धुमाकूळ करत आहेत.
  • आता बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरे आणि अर्चना गौतम शहरात एकत्र दिसले.
  • घरात त्यांच्यात जोरदार भांडण झाले जे नियंत्रणाबाहेर गेले

Shiv Thakare and Archana Gautam Hatred Fight End: बिग बॉस 16 संपले असले तरी स्पर्धक अजूनही  एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये धुमाकूळ घालत आहेत. बिग बॉस विजेता एमसी स्टॅनटच्या इंस्टाग्राम लाइव्हचा नवा रेकॅार्ड असो किंवा शिव ठाकरे याचे त्याच्या मूळ गावी अमरावतीत झालेलं स्वागत याची मोठी चर्चा माध्यमांमध्ये झाली होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर स्टार्स मुलाखती देण्यात व्यस्त आहेत. आता बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरे आणि अर्चना गौतम शहरात एकत्र दिसले. दोघांमधील जवळीक पाहून असे वाटत आहे की, शिव आणि अर्चना त्यांच्यातील वैर कमी झाले असून ते दोघेही आता पक्के मित्र झालेत.  

अधिक वाचा  : या आहेत जगातील टॉप-9 महिला क्रिकेटपटू

सोशल मीडियावर शिव आणि अर्चनाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, शिव ठाकरे अर्चना गौतमचे कौतुक करत आहे.  बिग बॉसच्या घरात जर ही नसती तर मजा नसती आली, असं म्हणत शिवने तिचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर शिव आणि अर्चनाने एकत्र खूप छान रोमँटिक डान्स देखील केला. एवढेच नाहीतर बिग बॉस 16 सक्सेस पार्टीमध्येही  शिव आणि अर्चनाने एकत्र मस्त डान्स परफॉर्मन्स दिला होता.

अधिक वाचा: Sid kiara's new home: सिद्धार्थ आणि कियाराच्या घरात शिरले माकड; बघा हा मजेशीर व्हिडीओ

 बिग बॉस 16च्या घरामध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतममध्ये जबरदस्त भांडण झालं होतं हे सर्वांना माहिती आहे. एक वेळेला अर्चनाला शोमधून बाहेर काढले गेले होते, कारण घरात शिव आणि अर्चना यांच्यात जोरदार भांडण झाले जे नियंत्रणाबाहेर गेले. त्यावेळी तिने शिव ठाकरेंसोबत हाणामारी केली होती. ज्यावेळी अर्चनाने माफी मागितली त्यानंतर अर्चनाला बिग बॉसमध्ये परत आणण्यात आले. माफी मागितल्यानंतरही शिव ठाकरेंसोबतचा तिचा संघर्ष संपला नाही. शेवटपर्यंत दोघेही एकमेकांशी भांडत होते. 

या सगळ्यामध्ये अशी अफवा समोर येत आहे की, शिव ठाकरे आणि अर्चना गौतम हे कंगना रनौतचा शो लॉक अपच्या सीजन 2मध्ये एकत्र दिसू शकतात. शिव ठाकरे लवकरच खतरों के खिलाडी 13 मध्ये  कंटेस्टेंट होऊ शकतो. या शोचे रोहित शेट्टी होस्ट आहेत. मात्र, या बातम्यांना अद्याप कोणतीच  पुष्टी मिळालेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी