Mirzapur 3 shooting will start soon : पंकज त्रिपाठी त्याचा आगामी चित्रपट शेरदिल: द पिलीभीत सागाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, पुढील आठवड्यापासून मी मिर्झापूर या त्याच्या लोकप्रिय वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनचे शूटिंग सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेबसीरिजमध्ये ते कालीन भैय्याची भूमिका साकारत आहे. 2020 मध्ये रिलीज झालेल्या या वेबसीरिजचा दुसरा सीझन भारतात सर्वाधिक पाहिला गेला होता.
या वेबसीरिजच्या शूटिंगबद्दल बोलताना पंकज म्हणाला,"मिर्झापूर वेबसीरिजबद्दल चाहत्यांमध्ये किती उत्साह आहे हे मला माहीत आहे. मी उद्यापासून कॉस्च्युम ट्रायल करेन आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यापासून शूटिंगला सुरुवात होईल. नुकतीच मी या वेबसीरिजची संपूर्ण स्क्रिप्ट ऐकली.मी सुद्धा पुन्हा कालीन भैया बनण्यासाठी तयार आणि उत्साही आहे.
पुढे बोलताना पंकज म्हणाला, मिर्झापूर शो आणि कालीन भैय्या यांच्या भूमिका साकारताना मला खूप मजा येते. मी खऱ्या आयुष्यात शक्तीहीन माणूस आहे, कालीन भैय्याच्या भूमिकेत मी स्वत:ला ताकदवान असल्याचा अनुभव घेऊ शकतो. याला ताकद म्हणा किंवा सत्ता म्हणा, प्रत्येकजण त्याचा भुकेला आहे. हे मिर्झापूरमध्ये दाखवले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे.
पंकजचा शेरदील : द पिलीभीत सागा 24 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सयानी गुप्ता आणि नीरज काबी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सृजित मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.