शुद्धी कदम ठरली ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ची महाविजेती

Shuddhi Kadam : अटीतटीच्या या लढतीत ठाण्याच्या शुद्धी कदमने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

Shuddhi Kadam became the grand winner of Mi honar superstar little master
शुद्धी कदम ठरली ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ची महाविजेती 
थोडं पण कामाचं
  • सुपरस्टार होण्याचं स्वप्न झालं साकार
  • स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.
  • राजयोग धुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगली.

मुंबई :  स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. राजयोग धुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत ठाण्याच्या शुद्धी कदमने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली.(Shuddhi Kadam became the grand winner of Mi honar superstar little master)

अधिक वाचा : ​ अशक्तपणा आला असेल तर करा गुळाचे सेवन, आणि पहा फरक

तर उपविजेते ठरले सार्थक शिंदे आणि राजयोग धुरी. सायली ठाक ठरली तृतीय क्रमांकाची मानकरी, तर सिद्धांत मोदी आणि राधिका पवारला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. विजेती शुद्धी कदमला चार लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं.

shuddhi kadam 1

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना शुद्धी कदम भावूक झाली होती. हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना तिने व्यक्त केली. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी शुद्धीने बरीच मेहनत घेतली होती. महाअंतिम सोहळ्यातलं उत्तम सादरीकरण तिला विजेतेपद देऊन गेलं.

अधिक वाचा : ​या घरगुती उपायांनी मिळवा पिवळ्या दातांपासून सुटका 

rajyog and sarthak

इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे शुद्धी कदम आणि तिचे कुटुंबिय आनंदात आहेत. शुद्धीने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या मंचावर तिला गाण्याचे वेगवेगळे प्रकार सादर करता आले. या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, अविनाश-विश्वजीत गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळाल्याची भावना शुद्धीने व्यक्त केली.

शुद्धी कदम या पर्वाची विजेती असली तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. या सर्व स्पर्धकांच्या पुढील वाटचालीसाठी स्टार प्रवाह परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी