Smriti Irini: कपिल शर्माच्या शोचं शूटिंग न करताच परतल्या स्मृती इराणी, जाणून घ्या काय आहे कारण

Smriti Irini: अभिनेत्री स्मृती इराणी कपिल शर्माच्या शोमधून शूटिंग न करताच परतल्या. सुरक्षारक्षकांनी स्मृती यांना ओळखलेच नाही.

Smriti Irani returned without shooting Kapil Sharma's show
शूटिंग न करताच परतल्या इराणी, सुरक्षारक्षकांनी ओळखलेच नाही  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्मृती इराणी शूटिंग न करताच परतल्या
  • कपिल शर्माच्या शोचं शूटिंग रद्द
  • सुरक्षारक्षकानं स्मृती इराणींना ओळखलंच नाही

Smriti Irini: टीव्ही अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या स्मृती इराणी (Smriti Irini) द कपिल शर्मा शोमध्ये पाहुण्या म्हणून हजेरी लावणार होत्या. मात्र, आता तसे होणार नाही. स्मृती शूटिंग न करता परतल्या आहे. स्मृती इराणी त्यांच्या 'लाल सलाम' या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी येथे येणार होत्या, मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. अखेर स्मृती इराणींना परतावे लागले.

the kapil sharma show: 'कपिल शर्मा शो' च्या गार्डने स्मृती इराणींना रोखलं,  रागात घरी परतल्या केंद्रीय मंत्री - the kapil sharma show security guard  did not allow smriti irani car to the


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री शूटिंगसाठी प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्या तेव्हा तेथील सुरक्षा रक्षक अण्णा त्यांना ओळखू शकले नाहीत. 
स्मृती यांनी त्यांना सांगितले की त्यांना सेटवर एपिसोड शूट करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, त्या शोच्या खास पाहुण्या आहेत.
त्यावर गार्ड म्हणाला, 'आम्हाला कोणताही आदेश मिळालेला नाही, माफ करा मॅडम, तुम्ही आत जाऊ शकत नाही.'

Smriti Irani refused to help, allege children of Yamuna Expressway accident  victim | India News - Times of India
हा सगळा गैरसमज स्मृती इराणीचा ड्रायव्हर आणि कपिल शर्मा शोचा गेटकीपर यांच्यात झाला, असे अनेकांचे म्हणणे आहे. 
याची कल्पना कपिल शर्मा किंवा स्मृती इराणी यांनाही नव्हती. मात्र, जेव्हा कपिल आणि त्याच्या प्रॉडक्शन टीमला याची माहिती मिळाली तेव्हा सेटवर एकच गोंधळ उडाला.


स्मृती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर नाही

स्मृती इराणीने एकता कपूरच्या क्यूोकी सास भी कभी बहु थी या शोमध्ये तुलसीची भूमिका साकारली होती. या एका शोमुळे स्मृतीला टीव्ही जगतात खूप प्रेम आणि ओळख मिळाली. तेव्हापासून एकता कपूर आणि स्मृती इराणी यांची मैत्री झाली. स्मृती इराणी आणि एकता कपूर नेहमीच एकमेकांच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. दोघेही अनेकदा पार्टीत एकत्र दिसतात. इतकंच नाही तर स्मृती इराणींच्या पोस्टवर इंडस्ट्रीतील लोकही तिखट कमेंट करतात.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी