Sonalee Kulkarni : ".... आणि म्हणूनच आमच्या मैत्री झाली नाही," असं कोणाबद्दल म्हणतेय सोनाली कुलकर्णी?

मालिका-ए-रोज
Updated Sep 18, 2022 | 13:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sonalee Kulkarni:स्मॉल स्क्रीनवरील 'बस बाई बस'(Bas bai Bas) हा रिएलिटी शो सध्या प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी (celebrity), राजकारणी पाहुणे म्हणून येतात. यावेळी अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी सोनालीने (Sonalee Kulkarni) अमृता खानविलकरविषयी (Amruta Khanvilkar) केलेल्या वक्तव्यामुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Sonalee kulkarni talks about Amruta khanvilkar
सोनाली कुलकर्णी आणि 'या'अभिनेत्रीमध्ये मैत्री की वैर?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमृता खानविलकरविषयी सोनाली कुलकर्णीने मांडलं परखड मत
  • ... आणि म्हणूनच आमच्या मैत्री झाली नाही असं म्हणतेय सोनाली कुलकर्णी
  • सोनाली कुलकर्णी आणि अमृतामध्ये मैत्री की वैर?

Sonalee Kulkarni: स्मॉल स्क्रीनवरील 'बस बाई बस' (Bas bai Bas) हा रिएलिटी शो सध्या प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी (celebrity), राजकारणी पाहुणे म्हणून येतात. विशेष म्हणजे, केवळ महिला सेलिब्रिटीच या शोमध्ये हजेरी लावतात. सुबोध भावेचं (Subodh bhave) खुमासदार सूत्रसंचालन, आणि जोडीला महिलांची एक टीम या सेलिब्रिटींना एकाहून एक सरस प्रश्न विचारतात की सेलिब्रिटीही गोंधळून जातात. नुकतीच अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. (Sonalee kulkarni talks about Amruta khanvilkar in bas bai bas reality show)

या कार्यक्रमात सुबोध भावे आणि त्याची टीम या पाहुण्यांना एकाहून एक  सरस प्रश्न विचारत गोंधळात टाकतात. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णींला अमृता खानविलकरविषयी प्रश्न विचारण्यात आला. अर्थात त्या प्रश्नाला सोनालीने नीट उत्तर दिलं. सोनालीला अमृताचा फोटो दाखवण्यात आला, आणि विचारण्यात आलं की, "सोनाली आणि अमृता खानविलकर यांच्यात वैर की मैत्री?" अर्थात या प्रश्नाला सोनालीने अगदी नीट उत्तर दिलं. 

अधिक वाचा : दोन बिबट्यांचा नारळाच्या झाडावर थरार, नाशकातील VIDEO VIRAL

"सोनाली म्हणते, 'प्रेक्षकांनी आमच्यात वैर असल्याचं, कॅट फाईट असल्याचं पसरलवलं. आमच्यात वैर नसलं तरी मैत्री वगैरेही नाही. जर आम्ही एखादा सिनेमा एकत्र केला असता तर कदाचित आमच्या मैत्री होऊ शकली असती. मात्र, तसं काही आमच्याबाबतीत घडलं नाही. आजच्या घडीला दोघीही इतकी वर्ष इंडस्ट्रीत आहोत, पण आमच्यात मैत्री वगैरे नाही" सोनालीच्या या वक्तव्यांवरून अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या वैर जरी नसलं तरी मैत्रीही नाही हे ही तितकंच खरं आहे असं म्हणायला हरकत नाही. 

अधिक वाचा : कमी वयात उगाचच म्हातारे होऊ नका

'बस बाई बस' या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी महिलांनी हजेरी लावली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे एपिसोड्स खूपच गाजले होते. सुबोध भावे आणि त्याच्या टीमने विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी जबरदस्त उत्तरं दिली आहेत. आता सोनाली कुलकर्णीनं अमृताविषयी काही स्पष्ट विधानं केली आहेत. आता सोनालीच्या वक्तव्यांवर अमृता खानविलकर काय उत्तर देते तेच पाहायचं

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी