Bigg Boss marathi 3 update : बिग बॉसच्या घरातून सोनाली पाटीलने घेतला निरोप? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

मालिका-ए-रोज
Updated Dec 19, 2021 | 20:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss marathi 3 update marathi 3 update: बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचलाय. आज कोण एलिमिनेट होणार? विशाल निकम तिकीट टू फिनालेमार्फत आधीच फायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे आता उत्कर्ष, मीरा आणि सोनालीपैकी कोण जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

Big boss marathi 3 update
बिग बॉसच्या घरातून कोण जाणार याची उत्सुकता |   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मीनलच्या कॅप्टन्सीने गाजवला बिग बॉस मराठीचा हा आठवडा
  • बिग बॉसच्या घरातून कोण निरोप घेणार? कोण होणार एलिमिनेट?
  • बिग बॉस मराठी सिझन 3 आज मिळणार टॉप 5 स्पर्धक?

Bigg Boss marathi 3 update marathi 3 elimination: बिग बॉस मराठी 3 आत अंतिम टप्प्यात पोहोचलाय. आता बिग बॉसच्या घरात उरलेत फक्त 7 सदस्य. त्यामुळे या आठवड्यात कोण बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार? कोण राहणार? याची उत्सुकता वाढलीय. हा आठवडा मीनश शाहाची कॅप्टन्सी, महेश मांजरेकरांनी त्यावरून मीनलची घेतलेली शाळा, विकास आणि मीनलचे भांडण, सोनाली आणि मीनलच्या मैत्रीत फूट यामुळे अधिक रंजक झाला. तर दुसरीकडे, तिकीट टू फिनाले जिंकत विशाल निकम फायनलमध्ये पोहोचलाय. 

यावेळी सोनाली, उत्कर्ष आणि मीरा डेंजर झोनमध्ये आहेत. त्यामुळे आता त्यांच्यापैकी कोण सदस्य बाहेर पडणार याची उत्सुकता आहे. मात्र, सोशल मीडियावर सोनाली पाटीलने घराचा निरोप घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे.


एकूणंच काय तर बिग बॉस मराठीच्या सिझन 3 मध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत आलीय. आतापर्यंत एकमेकांसाठी खेळणारे हे स्पर्धक आता पुढे कोणती नवी खेळी खेळणार? बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार हे पुढच्या रविवारी समजेलच. 26 डिसेंबरला बिग बॉसचा ग्रॅण्ड फिनाले रंगणार आहे. त्यामुळे हा आठवडा घरातल्या स्पर्धकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी