Subodh Bhave : सुबोध भावेची पहिली वेबसीरिज, असणार चित्तथरारक माईंड गेम; Teaser out

मालिका-ए-रोज
Updated Aug 27, 2022 | 17:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Subodh Bhave First web series teaser out : रंगभूमी, मालिका, सिनेमानंतर आता अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave)ओटीटीवर पदार्पण करायला सज्ज झालाय. 'कालसूत्र - प्रथम द्वार | मृत्यूदाता' (Kaalsutra Pratham Dwaar Mrityudata) ही मराठी वेबसीरिज (Marathi web series)घेऊन सुबोध प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रहस्यमय कथा असलेल्या या वेबसीरिजचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. सुबोध स्वत:चं या वेबसीरिजची निर्मिती करत आहे.

Subodh Bhave First marathi Web series Kaalsutra teaser out watch video
'या' वेबसीरिजमधून सुबोध भावेचे ओटीटवर पदार्पण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मराठी वेबसीरिजमधून सुबोध भावेचे ओटीटीवर पदार्पण
  • एक विकृत सिरियल किलर आणि एक कर्तबगार पोलिस अधिकारी यांच्यातला सामना
  • सयाजी शिंदे आणि सुबोध भावे वेबसीरिजचं मुख्य आकर्षण

Subodh Bhave First web series teaser out : रंगभूमी, मालिका, सिनेमानंतर आता अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) ओटीटीवर पदार्पण करायला सज्ज झालाय. 'कालसूत्र - प्रथम द्वार | मृत्यूदाता'  (Kaalsutra Pratham Dwaar Mrityudata) ही मराठी वेबसीरिज (Marathi web series) घेऊन सुबोध प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रहस्यमय कथा असलेल्या या वेबसीरिजचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. सुबोध स्वत:चं या वेबसीरिजची निर्मिती करत आहे. वेबसीरिजच्या पोस्टरमध्ये सुबोध भावे आणि सयाजी शिंदे (Sayaji Shinde ) आमनेसामने दिसले. सुबोध्या या पहिल्यावहिल्या मराठी वेबसीरिजचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 2023 मध्ये ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Subodh Bhave First marathi Web series Kaalsutra teaser out watch video)

अधिक वाचा : 'छैय्या छैय्या' गाण्यावर मलायका अरोराचा डान्स


 
वेबसीरिजचं पोस्टर, टीझर पोस्ट करत सुबोध भावेने लिहिले आहे, "आपल्या मराठी भाषेत एक उत्तम वेब सिरीज करावी आणि त्यात आपण काम करावं अशी खूप मनापासून ईच्छा होती.रहस्य कथा हा माझ्या आवडीचा विषय. २०२० लॉकडाऊन च्या काळात सलील देसाई यांची एक रहस्य कादंबरी वाचनात आली. ती वाचून ठरवलं की ही आपल्याला करता आली पाहिजे. आज  कादंबरी वाचून २ वर्षानंतर त्या वर आधारित मराठी मधील पहिल्या भव्य अशा वेब सीरिजची घोषणा करताना मनस्वी आनंद होतोय. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या वेब सीरिज च पाहिलं पोस्टर प्रकाशित करतोय. आज पोस्टर आणि उद्या त्याचा पहिला टीझर तुमच्या समोर येईल. नवीन वर्षात जाने २०२३ मध्ये ही वेब मालिका तुम्हाला पाहायला मिळेल. हे स्वप्न पूर्ण करण्यात अनेकांचा हातभार आहे, निखिल साने, मंजिरी भावे आणि ज्योती देशपांडे (जिओ स्टुडिओ) तसेच माझ्या पडद्यावरील आणि पडद्यामागे काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार एक चित्तथरारक माईंड गेम !!! एक विकृत सिरियल किलर.. आणि एक कर्तबगार पोलिस अधिकारी…जिओ स्टुडिओज् घेऊन येत आहे मराठीतला पहिलाच थरारक आणि रोमांचकारी Action Thriller वेब शो..'कालसूत्र - प्रथम द्वार | मृत्यूदाता' 

असं या पोस्टमध्ये सुबोध भावेने म्हटले आहे. सयाजी शिंदे आणि सुबोध भावे यांची जुगलबंदी या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. टीझर पाहूनच वेबसीरिजची उत्सुकता वाढलेली आहे. चाहते आणि सेलिब्रिटींनीही या कमेट्सचा वर्षाव केलेला आहे.

अधिक वाचा : नवाझुद्दीन सिद्दीकीच्या'हड्डी' सिनेमातील लूकची चर्चा

सुबोधच्या अभिनयाचा वेगळा पैलू या वेबसीरिजमध्ये दिसणार असं म्हणायला हरकत नाही. सो जस्ट वेट अँड वॉच. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी