'चीकू की मम्मी दूर की'मध्ये सुधा चंद्रन?

'चीकू की मम्मी दूर की' या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन दिसण्याची शक्यता आहे.

Sudha Chandran to play a cameo in Chikoo Ki Mummy Durr Kei?
'चीकू की मम्मी दूर की'मध्ये सुधा चंद्रन? 

थोडं पण कामाचं

  • 'चीकू की मम्मी दूर की'मध्ये सुधा चंद्रन?
  • 'चीकू की मम्मी दूर की'च्या प्रोमोत मिथुन चक्रवर्ती
  • मालिकेत सुधा चंद्रन दिसण्याची शक्यता

मुंबईः 'चीकू की मम्मी दूर की' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून, चाहते स्टार प्लसच्या या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत प्रसिद्ध झालेल्या या मालिकेच्या प्रोमोने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मालिकेचे निर्माते दर्शकांना आणखी एक आश्चर्याचा सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहेत. कदाचित आणखी एक दिग्गज कलाकार मालिकेत एन्ट्री घेताना दिसू शकेल. ताज्या बातमीनुसार निर्माते प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रनला आणण्याची योजना बनवत आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्यासाठी ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री सुधा चंद्रन या मालिकेत एक कैमियो (छोटी पण लक्षवेधी भूमिका) करताना पाहता येईल.

सुधा चंद्रन टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा आहे ज्या आपल्या असाधारण अभिनय आणि नृत्यासाठी ओळखल्या जातात. या मालिकेत नृत्याचे सुंदर एलिमेंट असून सुधाजींचा नृत्याशी थेट संबंध असल्याने, त्या निश्चितपणे यातील  कैमियोसाठी एक आदर्श पर्याय असतील. या बाबतत चर्चा सुरू असून दोन डान्सिंग स्टार चीकू आणि सुधाजी एकत्र येतील, तेव्हा तो शानदार नजारा पाहणे अधिक मनोरंजक असेल. तेव्हा, पहायला विसरू नका 'चीकू की मम्मी दूर की' संध्याकाळी सहा वाजता, फक्त स्टार प्लस वर!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी