द कपिल शर्मा शोमुळे प्रसिद्धी मिळालेला सुनील ग्रोवर ‘या’ कारणामुळे बघत नाही शो

मालिका-ए-रोज
Updated May 15, 2019 | 22:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sunil Grover on Kapil Sharma show: एकेकाळी द कपिल शर्मा या शोमुळे ओळखला जाणारा कॉमेडी अॅक्टर सुनील ग्रोवर आता या शो अजिबात पाहत नाही. याचं कारण विचारता पाहा नेमकं काय म्हणणं होतं कॉमेडी अभिनेता सुनील ग्रोवरचं.

Sunil Grover talks on Kapil Sharma Show
द कपिल शर्मा शोबद्दल सुनील ग्रोवर म्हणतो 

मुंबई: कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोची लोकप्रियता प्रचंड होती. त्याचसोबत तेवढीच लोकप्रियता गुत्थी आणि डॉक्टर गुलाटी म्हणून कॉमेडी अभिनेता सुनील ग्रोवरने मिळवली. शोमध्ये त्याचे हे कॅरेक्टर इतके गाजले की प्रक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. पण मध्यंतरी सुनील आणि शोचा मुख्य चेहरा असलेला कपिल शर्मामध्ये वाद झाले आणि शोला सुनीलने राम राम ठोकला. कपिलचा शो सुद्धा कालांतराने ऑफ एअर गेला. पण हा शो नव्या नावाने नव्या ढंगात सुरू झाला आणि प्रेक्षकांना सुनीलने शोमध्ये परतावं असं वाटू लागलं. अशा चर्चा सुद्धा मध्यंतरी रंगल्या पण तसं काही झालं नाही. या बद्दल खुद्द सुनील ग्रोवरला विचारता शोमध्ये परतणं तर दूर राहिलं तो सध्या हा शो बघत सुद्धा नाही असं त्याने म्हटलं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Today 2 pm.., PBN sn sec School.. Hope to meet all my old mates :) #Punjab ?

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

?

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

 

हा खुलासा त्याने करता, याचं नेमकं कारण काय असं विचारता तो म्हणाला की, ज्या गोष्टीशी त्याचा काही संबंध नसतो किंवा तो जोडला गेलेला नसतो, ती गोष्ट बघणं तो पसंद करत नाही. असे म्हणून सुनील शोमध्ये परतण्याच्या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम लागलाय असंच म्हणावं लागेल. सुनील लवकरच सलमान खानच्या भारत सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे सुनीलकडून हा खुलासा होण्याआधी, या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त तरी सुनील द कपिल शर्मा शोमध्ये दिसेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण ते होण्याची चिन्ह आता दिसत नाही आहेत. सुनील या मुलाखती दरम्यान असं सुद्धा म्हणाला की शोमध्ये तो परतावा असा सल्ला त्याला खुद्द सलमान खानकडून सुद्धा देण्यात आला होता, पण सध्या तरी त्याचा असा काही प्लॅन नाही आहे.

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Watch tkss tonight with my favorites #abbasmustan @kiaraaliaadvani n @themustafab #machineontkss 9pm @sonytvofficial

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

 

शोमधली कपिल आणि सुनीलच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप पसंत होती. पण त्यांच्यातल्या वादाने नको ते वळण घेतलं आणि या केमिस्ट्रीला प्रेक्षकांना मुकावं लागलं. मध्यंतरी कपिलने एका मुलाखतीत सुनील आपल्याला अजूनही आवडतो असं नमूद केलं होतं.  पुढे तो म्हणाला होता की त्याच्या आणि सुनीलमध्ये फक्त गैरसमज आहेत. यावर त्याला तो सुनीलला आपल्या शोमध्ये पुन्हा का घेऊन येत नाही असं विचारलं गेलं, त्यावर तो म्हणाला की तो सुनीलला शोमध्ये घेण्यासाठी तयार आहे, पण सुनीलला शोमध्ये परतण्यात रस नाही. सुनील ग्रोवर शोमध्ये पुन्हा दिसेल अशी आस अनेक दिवस प्रेक्षकांना लागून राहीली होती. पण सुनीलने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आणि सध्याची परिस्थिती बघता प्रेक्षकांची लाडकी गुत्थी आणि डॉक्टर गुलाटी शोमध्ये दिसणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी