Sunil Grover त्या घटनेबद्दल स्पष्टच बोलला सुनील ग्रोवर, एका रात्रीत शो मधून काढले बाहेर, गमावला होता आत्मविश्वास

मालिका-ए-रोज
Updated Mar 27, 2023 | 18:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sunil Grover सुनील ग्रोवरच्या विनोद बुद्धीचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. त्याची कॉमिक टाइमिंग अप्रतिम आहे. 'बागी', 'तांडव' आणि 'सनफ्लॉवर'  सारख्या अनेक चित्रपटाद्वारे आणि सिरिजद्वारे त्याने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात सुनील ने अनेकवर्षापूर्वी त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टीवर तो व्यक्त झाला.  काही वर्षांपूर्वी सुनील एका शोमधून तडकाफडकी काढण्यात आले होते, याबद्दल सुनीलने सांगितले की, "शो मधून काढल्यानंतर माझा आत्मविश्वास कमी झाला होता."

Sunil replaced to a show, without any inform he told that story
"फॉलोअर्सच्या आधारावर कोणालाही जज करू नका": सुनील ग्रोव्हर  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सुनील ग्रोवर हा एक उत्कृष्ट कलाकार आणि विनोदवीर आहे
  • 'द कपिल शर्मा शो' मध्ये डॉ. मशहूर गुलाटी आणि गुत्थी ही विनोदी पात्र साकारून प्रेक्षकांना भरभरून हसवले होते.
  • "शो मधून काढल्यानंतर माझा आत्मविश्वास कमी झाला होता." अनेक वर्षानंतर स्पष्टच बोलला सुनील

मुंबई : सुनील ग्रोवर हा एक उत्कृष्ट कलाकार आणि विनोदवीर आहे. त्याने 'बागी', 'गुडबॉय' आणि 'सनफ्लॉवर'  सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. 'तांडव' या वेबसिरिज मधील त्याचे काम लक्षवेधी ठरले. सुनील हा एक चांगला अभिनेता तर आहेच पण त्याबरोबरच सुप्रसिद्ध विनोदवीर देखील आहे. त्याने 'द कपिल शर्मा शो' मध्ये डॉ. मशहूर गुलाटी आणि गुत्थी ही विनोदी पात्र साकारून प्रेक्षकांना भरभरून हसवले होते. प्रेक्षकांनी देखील त्याच्या या पत्रांवर खूप प्रेम केले. 

अधिक वाचा : ​सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर बनली निखत झरीन

सुनील ग्रोवर ला 'द कपिल शर्मा शो' मुळे खूप प्रसिद्धी मिळाली. सुनीलने नुकत्याच एका कार्यक्रमात त्याच्या संघर्षाचे दिवस आठवले. त्याने कोणाचेही नाव न घेता, एका शोमधून रातोरात काढून टाकल्याबद्दल सांगितले. सुनीलने सांगितले की, अवघ्या तीन दिवसाच्या शूटनंतर अचानक त्याला शोमधून काढण्यात आले आणि त्याजागी दुसऱ्याला घेण्यात आले. त्या जुन्या घटनेवर अनेकवर्षानंतर सुनील मनमोकळेपणाने बोलला. 

सुनीलने ई टाइम्स ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हंटले की, कोणा दुसऱ्याच्या चुकीमुळे त्याचा स्वतःवरचा विश्वास कमी झाला होता. त्याने सांगितले की, "एक शो होता, ज्यात मला कोणतीही कल्पना न देता केवळ तीन दिवसांत रिप्लेस केले गेले. मला याबद्दल दुसऱ्यांकडून कळाले. मला स्वतःवर शंका येत होती, मला वाटत नव्हतं की मी पुन्हा जाऊ शकेन किंवा त्या लोकांसोबत शूट करू शकेन." 

अधिक वाचा : BCCIच्या नव्या करारानुसार हे 4 खेळाडू ए प्लस कॅटेगरीत

सुनील ग्रोवरने स्वतःला सावरले

सुनील पुढे म्हणला की, "मी जवळपास महिनाभर एका खोलीत बंद होतो, मग विचार केला की मी तसा नाही होणार. त्यांतर मला काय झाले माहीत नाही, एक प्रकारची जिद्द अंगात संचारली, ज्याने मला  'चल काही हरकत नाही... पुन्हा एकदा प्रयत्न करू' असे म्हणायला लावले" अश्याप्रकारे सुनील ने पुन्हा स्वतःला सावरत कॉमेडी शो होस्ट करण्यापासून अनेक चित्रपट आणि सिरिज मध्ये कामे केली.          

"फॉलोअर्सच्या आधारावर कोणालाही जज करू नका": सुनील ग्रोव्हर

सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या आधारे एखाद्याच्या क्षमतेचे परीक्षण केले जाऊ नये या मुद्द्यावरही सुनील ग्रोव्हरने आपले मत मांडले. “मी सर्वांना विनंती करतो की तुमचे किती फॉलोअर्स आहेत, तुमच्या किती कमेंट्स आहेत यावर कृपया स्वतःला जज करू नका. हे तुमच्यातली कार्यक्षमता ठरवेल. असे केल्याने अनेकजण डिप्रेशनमध्ये जाताना मी पाहिले आहेत, त्यामुळे कृपया असे करू नका."  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी