Sur Nava Dhyas Nava Season 3: ‘सूर नवा ध्यास नवा’चं तिसरं पर्व लवकरच भेटीला, असे रंगणार ऑडिशन्स

मालिका-ए-रोज
Updated Aug 19, 2019 | 13:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

सूर नवा ध्यास नवा या सिंगिंग रिअॅलिटी शोचं तिसरं पर्व लवकरच भेटीला येणार आहे. पहिल्या पर्वात प्रसिद्ध गायक-गायिका तर दुसऱ्या पर्वात छोटे सूरवीर हे पहायला मिळाले. तिसऱ्या पर्वामध्ये कोण? याचं उत्तर मिळणार आहे.

after the success of season 1 and 2 sur nava dhyas nava season 3 announced
Sur Nava Dhyas Nava Season 3: ‘सूर नवा ध्यास नवा’चं तिसरं पर्व लवकरच भेटीला, असे रंगणार ऑडिशन्स 

थोडं पण कामाचं

  • 'सूर नवा ध्यास नवा' पर्व तिसरे जाहीर- या रे या सारे या
  • २१ सप्टेंबर रोजी औरंगाबापासून ऑडिशन्सला सुरूवात
  • ५ ते ५५ वयोगटातील सगळेच होऊ शकतात यंदा कार्यक्रमाचा भाग

मुंबई: कलर्स मराठीवरील सिंगिंग रिअॅलिटी शो सूर नवा ध्यास नवा पहिल्या दोन पर्वांमध्ये फार लोकप्रिय झाला. पहिलं पर्व संपल्यावर दुसऱ्या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहचली होती. दुसऱ्या पर्व तर कमाल रंगलं आणि मग प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं याचं पुढचं पर्व कधी येते याकडे. अखेर ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण या लाडक्या शोचं तिसरं पर्व जाहीर झालं आहे. आता गाण्याची मैफल पुन्हा सजणार, सुरांशी पुन्हा मैत्री होणार, वाद्य आणि सूरांची पुन्हा गट्टी जमणार कारण आपला आवडता शो ‘सूर नवा ध्यास नवा’ लवकरच सुरू होणार आहे.

या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वामध्ये प्रसिद्ध गायक-गायिका स्पर्धक म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकले. पहिल्या पर्वाचा विजेता ठरला गायक अनिरुद्ध जोशी. पहिल्या पर्वात तेजश्री प्रधान सूत्रसंचालन करताना दिसली. तर परिक्षकांच्या खुर्चीत होते अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये छोटे सूरवीर आपल्या भेटीला आले. तसंच स्पृहाने सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतली आणि तिच्या जोडीला होता छोटा मॉनिटर हर्षद नायबळ, परिक्षक मात्र तेच राहीले. दुसऱ्या पर्वाची विजेती ठरली स्वराली जाधव. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या दोन पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी पुन्हा घेऊन येत आहे ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे तिसरे पर्व. तिसऱ्या पर्वात नेमकं कोणाच्या सुरांची जादू ऐकायला मिळणार याची उत्सुकता होती. ती आता संपत समजतंय की तिसऱ्या पर्वाचं विशेष म्हणजे स्पर्धकांना वयाची अट नसेल. ५ ते ५५ हा वयोगट असणार आहे म्हणेजच बच्चेकंपनीपासून सगळ्या वयोगटातील स्पर्धक या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील.

 

 

 

यावर्षी देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास २१ ऑगस्टपासून  सुरु होणार आहे. या पर्वाचा शुभारंभ सप्टेंबरमध्ये होणार आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील आपल्या सगळ्यांचा लाडका स्पर्धक पुष्कर जोग प्रत्येक शहरात सूरवीरांना प्रोत्साहन देईल तर सुप्रसिध्द संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर आणि संगीत दिग्दर्शक मिलिंद जोशी प्रत्येक शहरातून सूरवीरांचा शोध घेतील. तुम्ही सुद्धा यंदा या कार्यक्रमाचा भाग होऊ इच्छित असाल तर खलील माहिती तुमच्यासाठीच आहे कारण यंदाचे ऑडिशन्स असे रंगणार आहेत.

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या औरंगाबादमधील ऑडिशन्स २१ ऑगस्ट रोजी पार पडणार आहेत. स्थळ - एम. जी. एम. फिल्म आर्टस्, एम. जी. एम. कॉलेज ऑफ जर्नालिझम, एम. जी. एम. कॅम्पस, एन./६, सिडको, औरंगाबाद. वेळ – सकाळी ९ ते संध्या. ४ . या शहरांमधून जे स्पर्धक निवडले जातील त्यांना अंतिम फेरीसाठी मुंबईमध्ये यावे लागेल.

 

 

इतर शहरांतील स्थळ आणि तारीख :

२२ ऑगस्ट गुरूवार (नाशिक) - रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूल

उपेंद्र नगर बस स्टॉप, त्रिमूर्ती चौक, पाथर्डीफाटा लिंक रोड, नाशिक  - ४२२०१०

 

२४ ऑगस्ट शनिवार (पुणे) - डी. ई. एस. सेकंडरी स्कूल

१४/अ, लाल बहादूर शास्त्री रोड, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०

 

२५ ऑगस्ट रविवार (ठाणे) - जोशी बेडेकर कॉलेज (ठाणा कॉलेज)

चेंदनी बंदर रोड, जांभळी नाका, ठाणे (पश्चिम) - ४००६०१

 

२८ ऑगस्ट बुधवार (नागपूर) - अंचाबाई धर्मशाळा,

श्री महावीर हनुमान मंदिर कमिटी, भक्तीधाम, आझाद चौक, सदर, नागपूर - ४४०००१

 

३१ ऑगस्ट शनिवार (मुंबई) साने गुरुजी विद्यालय,

भिकोबा पाठारे मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८

 

५ सप्टेंबर गुरूवार (रत्नागिरी) गोगटे जोगळेकर महाविद्यालय,

कोर्ट रोड, रत्नागिरी

अधिक माहितीसाठी लॉग इन करा http://www.colorsmarathi.com/shows/Sur_Nava_Dhyas_Nava_Little_Champs/ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...