Akshay Mud awadkar : मराठी सिनेमांप्रमाणेच आता टेलिव्हिजन क्षेत्रामध्येही चरित्रकथांना मोठी लोकप्रियता मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. यामध्ये सध्या स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित मालिका जय जय स्वामी समर्थ मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. या मालिकेमध्ये स्वामींची मूळ भूमिका साकारणार्या कलाकाराबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. त्यांनी साकारलेली स्वामींची भूमिका अनेकांचे लक्ष वेधून घेत असल्याने हे कलाकार कोण हा प्रश्न तुमच्यादेखील मनात असेल तर जाणून घ्या ही भूमिका साकारणार्या अक्षय मुडावदकर (Akshay Mudawadkar) यांच्याबद्दल काही खास गोष्टी ज्या तुम्हांला माहिती नाही आहे.
स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक होते. सोलापूर जवळील अक्कलकोट हे त्यांचे मूळ क्षेत्र आहे. अक्षय हे सध्या घराघरामध्ये त्यांची भूमिका साकारत भाविकांच्या भेटीला टेलिव्हिजनच्या माध्यमातून येत आहे. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.' असा मंत्र देणार्या स्वामी समर्थांचे तारकमंत्र, आरती, जपमंत्र हे त्यांच्या भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.