मुंबई : झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली तू तेव्हा तशी ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील पट्या आणि अनामिकाची अव्यक्त प्रेम कहाणी हळूवार फुलताना प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. या मालिकेतील सौरभ म्हणजेच स्वप्नील जोशी आणि अनामिका म्हणजेच शिल्पा तुळसकर यांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांची जोडी देखील प्रेक्षकांना आवडली आहे.
आता या मालिकेत प्रेक्षक पाहू शकतील कि सौरभच्या घरी जे पाच लाख आलेले आहेत त्यातून वल्ली दागिन्यांची खरेदी करते. ते दागिने खोटे आहेत हे अनामिका सांगते. आता ते पाच लाख परत आणण्यासाठी सौरभ मधला पट्या जागा होतो आणि सर्वसामान्य माणसांची फसवणुक करणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे हे सौरभ मनाशी ठरवतो. त्या सोनाराच्या दुकाना बाहेर आपल्याला गर्दी दिसते अनेकांची फसवणूक झालेली आहे. त्या फसवणूक करणाऱ्या माणसांना धडा शिकवण्यासाठी सौरभ पंजाबी माणसाचं रूप घेतो आणि त्या माणसांना शोधून चांगला चोप देतो.
सौरभच्या या पंजाबी लूकमुळे प्रेक्षकांची हा भाग बघण्याची उत्सुकता खूप वाढली आहे. स्वप्नीलने या पंजाबी लुकमधील फोटोज सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे. चाहत्यांचा या फोटोला आणि स्वप्निलच्या या पंजाबी लुकला तुफान प्रतिसाद मिळतोय.
तेव्हा सौरभ पाजीला फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवताना पाहण्यासाठी बघायला विसरू नका तू तेव्हा तशी सोमवार ते रविवार रात्री ८ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर