स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा, रविवारपासून दूरदर्शनवर

Swaraj – The Comprehensive Story of India's Freedom Struggle, on Doordarshan from Sunday : ‘स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ ही मालिका दूरदर्शनवर दर रविवारी रात्री ९ ते १०  या वेळेत प्रसारित केली जाईल. या मालिकेचा पहिला भाग उद्या १४ ऑगस्ट २०२२ रोजी दाखविण्यात येणार आहे.

Swaraj – The Comprehensive Story of India's Freedom Struggle, on Doordarshan from Sunday
स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा
  • मालिका दूरदर्शनवर दर रविवारी रात्री ९ ते १०  या वेळेत
  • ‘स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ २० ऑगस्टपासून मराठीतून प्रसारित होणार

‘स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ ही मालिका दूरदर्शनवर दर रविवारी रात्री ९ ते १०  या वेळेत प्रसारित केली जाईल. या मालिकेचा पहिला भाग उद्या १४ ऑगस्ट २०२२ रोजी दाखविण्यात येणार आहे. ( Swaraj – The Comprehensive Story of India's Freedom Struggle, on Doordarshan from Sunday )

‘स्वराज – द होल स्टोरी ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ ही एक मेगा ऐतिहासिक लघुपट मालिका आहे. १५ व्या शतकापासून ते २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा निर्भीड, गौरवशाली इतिहास दूरदर्शनच्या माध्यमातून दाखविण्याला जाईल.

ही मालिका फक्त  इंग्रजांनी केलेल्या  अन्यायावर नाही तर डच, फ्रेंच, पोर्तुगीज वसाहतवाद्यांच्या विरोधात आवाज उठविलेल्या ७५ ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांवर आधारित आहे. या मालिकेत राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, मॅडम भिकाजी कामा, गणेश आणि विनायक सावरकर, नाना साहेब आणि बाजीराव पेशवे, तसेच राणी आबक्का, बक्षी जगबंधू, तिरोत सिंग, सिद्धो कांथो मुर्मू, यासारख्या सुप्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या गाथांचा यात समावेश असणार आहे. यासह शिवाप्पा नायक, कान्होजी आंग्रे, राणी गैदिनलिऊ, तिलका मांझी यांसारख्या कमी ज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या कथाही प्रसारित केल्या जातील.

ही मालिका 4K/HD सारख्या उच्च प्रणाली गुणवत्तेसह आणि विस्तृत संशोधनानंतर तयार केली गेली आहे. त्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्वही आहे. लोकप्रिय चित्रपट अभिनेते मनोज जोशी यांनी या मालिकेत सूत्रधाराची भूमिका साकारली आहे.

‘स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ २० ऑगस्टपासून मराठीतून प्रसारित होणार

‘स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ २० ऑगस्टपासून सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवरून मराठीत प्रसारित होणार आहे. मराठी भाषेसह  इंग्रजी , तमिळ, तेलुगू, मल्याळम,  कन्नड, गुजराती, बंगाली, उडिया आणि आसामी  अशा आठ प्रादेशिक भाषांमध्येही २० ऑगस्टपासून रात्री ८ ते ९ वाजता  प्रादेशिक वाहिन्यांवरून  प्रसारित केली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी