स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पूर्ण करतेय ५०० भागांचा टप्पा

मालिका-ए-रोज
Updated Apr 20, 2019 | 18:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आज ५०० भागांचा टप्पा पूर्ण करत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या मोठ्या पसंती मिळत आहे.

swarajyarakshak sambhaji
स्वराज्य रक्षक संभाजी  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिका स्वराज्य रक्षक संभाजी लवकरच एक मोठा पल्ला गाठत आहे. ही मालिका ५०० भाग पूर्ण करत आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया पेजवरून ही माहिती देण्यात आली आहे. झी मराठीवर ही मालिका दररोज सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येते. आज या मालिकेचा ५००वा एपिसोड असणार आहे. ही मालिका सुरू झाल्यानंतर अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या मालिकेचा चाहतावर्ग इतका मोठा वाढला आहे की ही सीरियल पाहिल्याशिवाय दिवस पूर्ण झाला असे त्यांना वाटत नाही. 

 

 

या मालिकेतील पात्रे, त्यांच्या भूमिका, इतिहास सारेच प्रेक्षकांना आवडत आहे. अमोल कोल्हे या मालिकेत संभाजी राजांची भूमिका साकारत आहे. तर प्राजक्ता गायकवाड हिने संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. शंतनू मोघे यांनी यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. यासोबतच प्रतीक्षा लोणकर, स्नेहलता वासाईकर, पल्लवी वैद्य, अश्विनी महांगडे यांच्याही यात भूमिका आहेत. 

संभाजी राजे राजकारणात

या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असलेले संभाजी राजे उर्फ डॉ.अमोल कोल्हे यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवत असून शिरूरचे ते उमेदवार आहेत. त्यांचा प्रचारही जोमाने सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पूर्ण करतेय ५०० भागांचा टप्पा Description: स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आज ५०० भागांचा टप्पा पूर्ण करत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या मोठ्या पसंती मिळत आहे.
Loading...
Loading...
Loading...