Swwapnil Joshi स्वप्नील जोशीने खरेदी केली नवी लक्झरी इलेक्ट्रिक कार

Swwapnil Joshi's electric car अभिनेता स्वप्नील जोशी याने लक्झरी इलेक्ट्रिक कार खरेदी केली. या कारचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला.

Swwapnil Joshi buys a new luxurious electric car
स्वप्नील जोशीने खरेदी केली नवी लक्झरी इलेक्ट्रिक कार 
थोडं पण कामाचं
  • स्वप्नील जोशीने खरेदी केली नवी लक्झरी इलेक्ट्रिक कार
  • 'जॅग्वार आय पेस' ही लक्झरी कार खरेदी केली
  • कारची किमान किंमत एक कोटी सहा लाख रुपये

Swwapnil Joshi buys a new luxurious electric car मुंबईः अभिनेता स्वप्नील जोशी याने लक्झरी इलेक्ट्रिक कार खरेदी केली. या कारचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला. व्हिडीओ पाहून अनेकांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले. मनोरंजन सृष्टीतील अनेकांनी स्वप्नीलची नव्या कारचे विशेष कौतुक केले. 

सारेगमप लिटिल चॅम्प्स स्पर्धकांनी घेतले राज ठाकरेंचे आशिर्वाद!

स्वप्नील जोशीने 'जॅग्वार आय पेस' ही लक्झरी कार खरेदी केली. ही पाच आसनी कार आहे. या कारची लिथियम बॅटरी पूर्ण चार्ज केली तर कार सलग ४७० किमी प्रवास करण्यास सक्षम आहे. २९४ किलोवॅट अश्वशक्ती वेगाने धावणाऱ्या या कारचे वजन २ हजार २०८ किलो आहे. कारचा सर्वाधिक वेग ताशी २०० किमी एवढा आहे. ही कार फक्त ४.८ सेकंदात सर्वोच्च वेग गाठण्यास सक्षम आहे. कारच्या वैशिष्ट्यांनुसार किंमतीत बदल होत असला तरी या कारची किमान किंमत एक कोटी सहा लाख रुपये आहे.

स्वप्नीलची लक्झरी कार पाहून अभिनेता सुबोध भावे याने 'भारी आहे' अशी प्रतिक्रिया दिली तर अभिनेता सुयश टिळकने इमोजी पोस्ट करुन 'कारमुळे तुझा हेवा वाटतो, आता मी तुझ्यावर जळू लागलोय' अशा स्वरुपाची प्रतिक्रिया दिली. अभिनेता भरत जाधवने 'वा... मस्त..., खुप खुप शुभेच्छा...' अशा शब्दात स्वप्नीलचे अभिनंदन केले. अभिनेत्री अमृता खानविलकरने 'अभिनंदन, व्हॉट अ ब्युटी' अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली.

स्वप्नील जोशी हा मनोरंजन सृष्टीतील एक अनुभवी अभिनेता आहे. बालपणी श्रीकृष्णाच्या भूमिकेतून मनोरंजन सृष्टीत पदार्पण करणाऱ्या स्वप्नील नंतर मराठी, हिंदी टीव्ही मालिका तसेच मराठी आणि हिंदी सिनेमांमधून भूमिका साकारल्या आहेत. त्याने वेबसीरिजमधूनही काम केले आहे. सध्या तो झी मराठी वाहिनीच्या चला हवा येऊ द्या या विनोदी शो मध्ये कलाकर आणि पाहुणे यांच्यात मॉडरेटर म्हणून मुख्य अतिथीच्या आसनावर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी