'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची बबीता अपघातात जखमी

taarak mehta ka ooltah chashmah fame munmun dutta accident in germany : लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये बबीता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता ही अपघातात जखमी झाली.

taarak mehta ka ooltah chashmah fame munmun dutta accident in germany
'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची बबीता अपघातात जखमी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची बबीता अपघातात जखमी
  • जर्मनीत झाला अपघात
  • जखमी बबीता मायदेशी परतली

taarak mehta ka ooltah chashmah fame munmun dutta accident in germany : लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये बबीता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता ही अपघातात जखमी झाली. मालिकेतून सुटी घेऊन फिरण्यासाठी जर्मनीला गेलेल्या अभिनेत्री मुनमुन दत्ताने अपघातात जखमी झाल्याची माहिती दिली. 

जर्मनीत एक छोटा अपघात झाला. या अपघातात डाव्या पायाच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली. दुखापत झाल्यामुळे सहल अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले; अशी माहिती अभिनेत्री मुनमुन दत्ताने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून दिली आहे. सहल अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागल्यामुळे दुःखी झाल्याचे सांगण्यासाठी 'ब्रोकन हार्ट' ही इमोजी वापरून अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिची स्टोरी इन्स्टावर पोस्ट केली आहे. 

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेच्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन अभिनेत्री मुनमुन दत्ता परदेशात फिरायला गेली आहे. ती आधी स्वित्झर्लंड येथे गेली. स्वित्झर्लंडमधील इंटरलेकन येथून ट्रेनने अभिनेत्री मुनमुन दत्ता जर्मनीत दाखल झाली. जर्मनीत असतानाच अपघातामुळे मुनमुन दत्ता जखमी झाली. जखमी झाल्यामुळे मुनमुन दत्ता सहल अर्धवट सोडून भारतात परतली. स्वित्झर्लंडमध्ये फिरत असतानाचे अनेक फोटो अभिनेत्री मुनमुन दत्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. पण जर्मनीत जखमी झाल्यामुळे तिची सहलीची योजना फिस्कटली.

Siddhaanth Surryavanshi : टीव्ही जगताला आणखी एक धक्का, जिममध्ये वर्कआउट करताना 'कसौटी जिंदगी की' च्या अभिनेत्याचा मृत्यू

Sunil Shende death : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

अभिनेत्री मुनमुन दत्ता ही 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कॉमेडी टीव्ही कार्यक्रमात बबीता ही भूमिका साकारत आहे. मालिकेतील तिच्या अभिनयाचे चाहते कौतुक करत असतात. मालिकेत जेठालाल ही भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी बबीता या शेजारणीवर एकतर्फी प्रेम करत असतो. पण स्वतःच्या संसाराच्या जबाबदारीचे भान राखून मर्यादा जपत असतो असे दाखवले आहे. जेठालाल आणि बबीता यांची मालिकेतली भन्नाट केमिस्ट्री कौतुकास पात्र ठरली आहे. चाहत्यांना टीव्ही स्क्रीनवर जेठालाल आणि बबीता यांच्यातील अनोखी केमिस्ट्री बघायला आवडते. पण आता बबीताला दुखापत झाल्यामुळे ती आणखी काही काळ मालिकेपासून लांब राहण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी