Gurucharan Singh Struggle: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रोशन सिंग सोढीवर कर्जाचा डोंगर, कर्ज फेडण्यासाठी केले 'हे' काम

मालिका-ए-रोज
Updated Jul 22, 2022 | 16:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gurucharan Singh Struggle:स्मॉल स्क्रीनवरील गाजलेला कॉमेडी टीव्ही शो'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये रोशन सिंग सोधीची भूमिका साकारणाऱ्या गुरचरण सिंग यांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला. एकदा तर हे कर्ज वसूलीसाठी त्यांच्यामागे काही माणसं लागली , आणि मग त्यांनी असा निर्णय घेतला, ज्याने त्यांचे आयुष्य बदलले.

Gurucharan Singh Struggle
कर्ज फेडण्यासाठी गुरुचणर सिंगने केले 'हे' काम  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • गुरुचरण सिंगवर होता कर्जाचा डोंगर
  • 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये साकारत होते रोशन सिंग सोढीची भूमिका
  • 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळे घराघरात पोहोचले गुरुचरण सिंग

Roshan Singh Sodhi means Gurucharan Singh Life Struggle: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' '(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही टीव्ही जगतातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. ही कॉमेडी मालिका जवळपास 14 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडत आहे. प्रत्येकाचा स्वत:चे फॅन फॉलोइंग आहे. मग ते भिडे असो, जेठालाल-दयाबेन असो, किंवा मग बबिता असो, साऱ्यांनीच प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे. या मालिकेत सुरुवातीपासून काम करणाऱ्या कलाकारांपासून ते या शोला अलविदा करणाऱ्या कलाकारांनीही चाहत्यांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राबद्दल प्रेक्षकांना माहिती आहे. मात्र, रोशन सिंग सोधी  (Roshan Singh Sodhi) अर्थातच गुरुचरण सिंगच्या (Gurucharan Singh) खऱ्या आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही ना, तर मग आज आम्ही तुम्हाला त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल काही सांगणार आहोत. ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Gurucharan Singh as Roshan singh sodhi was in Burdened debt )

 

अधिक वाचा : व्हायरल व्हीडीओ प्रकरणाविषयी रुपाली चाकणकर म्हणाल्या......

गुरुचरण सिंग यांना अचानक मुंबईला यावे लागले होते

'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्‍ये नेहमी पार्टीसाठी तयार असणा-या आणि पत्नीवर मनापासून प्रेम करणा-या रोशन सिंग सोढीचे खरे नाव गुरचरण सिंग आहे. गुरचरण सिंग (Gurucharan Singh) यांनी आपल्या मस्त अनोख्या शैलीने मालिकेत जीव ओतला होता. आज भलेही तो या शोचा भाग नसला तरी जेव्हा जेव्हा रोशन सिंग सोढीचा विषय येतो तेव्हा गुरचरण सिंगचा चेहरा सर्वात आधी आठवतो. मात्र, या मालिकेचा घटक होण्यापूर्वी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. काहीही पर्याय न उरल्याने अखेर त्यांना मुंबई गाठावी लागली होती. नक्की काय कारण होतं त्याचं?

गुरुचण सिंग यांच्यावर होता कर्जाचा डोंगर

एकेकाळी रोशन सिंग सोढीची  (Roshan Singh Sodhi) भूमिका साकारणाऱ्या गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) यांनी त्यांच्या एका लाइव्ह व्हिडिओमध्ये सांगितले होते की, ते अशा वेळी मुंबईत आले होते जेव्हा त्यांच्यावर खूप कर्ज होते. पैसे मागण्यासाठी लोक त्याच्या मागे लागले होते. गुरचरण सिंग यांना कुठूनही आशा न मिळाल्याने ते मुंबईला गेले आणि सहा महिन्यांतच त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) भूमिका मिळाली.

 

अधिक वाचा :  बीडच्या ऐश्वर्याच्या नृत्यावर थिरकणार दिल्लीकर


गुरुचरण सिंग यांनी ही मालिका सोडली

गुरचरण सिंग सुरुवातीपासूनच या मालिकेचा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) एक अविभाज्य घटक होते. मात्र, त्यांनी 2013 मध्ये शो सोडला खरा, पण लोकांच्या मागणीमुळे त्यांना 2014 मध्ये परत यावे लागले. त्यानंतर सहा वर्षे काम केल्यानंतर त्याने २०२० मध्ये पुन्हा एकदा या शोचा निरोप घेतला. यावेळी त्यांच्या जागी रोशन सिंग सोधीची भूमिका साकारणाऱ्या बलविंदर सिंग सूरीला घेण्यात आले. बलविंदर सिंग सूरी  (Balwinder Singh Suri) आता या मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी