Tarak Mehata komal bhabhi : 'तारक मेहता'मधील 'या' अभिनेत्रीला पाहिलंत तर ओळखणंही होईल कठीण

मालिका-ए-रोज
Updated Nov 20, 2022 | 20:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ambika Ranjankar: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (tarak mehata ka ulta chashma) या मालिकेत अंबिका रांजणकर (ambika ranjankar) डॉ. हाथी यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. अंबिकाच्या कॉलेजच्या दिवसातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांना ओळखणंही कठीण आहे.

tarak mehata fame ambika ranjankar college photo viral on social media
अशी दिसायची 'तारक मेहता..' मालिकेतील कोमल भाभी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तारक मेहतामधील 'ही' अभिनेत्री कॉलेजच्या दिवसांमध्ये अशी दिसायची
  • अंबिका रांजणकरचा कॉलेजमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
  • कॉलेजमधील आठवणींना उजाळा

Ambika Ranjankar: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (tarak mehata ka ulta chashma) या मालिकेत अंबिका रांजणकर (ambika ranjankar) डॉ. हाथी यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. अंबिकाच्या कॉलेजच्या दिवसातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांना ओळखणंही कठीण आहे. (tarak mehata fame ambika ranjankar college photo viral on social media)

अधिक वाचा : IND vs NZ: टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. लहान मुलांसह साऱ्यांनाच ही मालिका खूप आवडते. या शोमध्ये काम करणाऱ्या पात्रांनीही आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. मालिकेतली सारीच पात्र लोकप्रिय आहेत. या बातमीत आम्ही तुम्हाला कोमल भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंबिका रांजणकरबद्दल सांगणार आहोत. सध्या अंबिकाचे वजन खूप वाढले असले तरी तिच्या कॉलेजच्या काळात ती स्लिम आणि ट्रिम होती. अंबिकाच्या कॉलेजच्या दिवसातील एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अंबिका रांजणकर डॉ. हाथी यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. अंबिका सोशल मीडियावर फोटोंच्या माध्यमातून तिच्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी सांगताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिचे कॉलेजचे दिवस आठवत, अंबिकाने तिचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती खूपच स्लिम, ट्रिम आणि स्मार्ट दिसत होती. या फोटोत अंबिका रांजणकरने सलवार कमीज घातलेली आणि डोक्यावर स्कार्फ बांधलेला दिसत आहे.

अधिक वाचा :  'या' बागेतून उघडते मृत्यूचे दार

हा फोटो शेअर करताना अंबिकाने  कॅप्शनमध्ये लिहिले की, "फ्लॅशबॅक, आठवण, आठवणींना उजाळा. मी कॉलेजला असतानाचा हा फोटो, माझ्या मिठीबाई कॉलेजच्या अनेक आठवणी आहेत. मस्ती, मित्रमंडळी, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, ऑडिशन, रिहर्सल, नोटीस बोर्डवर लिहिलेली विजेत्यांची नावे, प्रसिद्ध हरिभाईचा कटिंग चहा, वडापाव, ब्रेड सांबार. मला आनंद आहे की आजही आम्ही एकमेकांशी जोडलेलो आहोत आणि आमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी करत आहोत."

अधिक वाचा : मुकेश अंबानी पुन्हा झाले आजोबा...मुलगी ईशाला झाले जुळे

सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडून गेलेले आहेत.  त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आता या मालिकेत नवी दयाबेन येणार असल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, प्रत्यक्षात अजूनही नव्या दयाबेनची मालिकेत एन्ट्री झालेली नाही. तसंच तारक मेहता ही भूमिका साकारणाऱा अभिनेता शैलेश लोढानेही ही मालिका सोडली आहे. त्यामुळे आता मालिकेत नव्या कलाकारांची वर्णी लागत आहे. सध्या सोशल मीडियावर कोमल भाभीच्या त्या व्हायरल फोटोमुळे मालिका चर्चेचा विषय ठरत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी